अतिशय दुर्मिळ आणि मौल्यवान मानले जाणारे तीन गजमौक्तिक ओशिवरा पोलिसांनी जप्त केले असून या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. गुजरातहून आलेले दोघेजण ओशिवरा येथे एका इमारतीमधील तिघांना हे गजमौक्तिक विकण्याचा प्रयत्न करत होते.
गुजरातहून आलेले संदीप मेहता (४८)आणि ललित देसाई (४०) हे दोघेजण गजमौक्तिक विकायला येणार असल्याची माहिती ओशिवरा पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मेगा मॉलच्या मनिष टॉवर येथे सापळा रचून छापा घातला. गजमौक्तिक विकत घेण्यासाठी आलेल्या राज द्विवेदी, मोहम्मद शेख आणि कमलेश विसाव यांच्यासह या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून कोटय़वधीच्या किमतीचे तीन गजमौक्तिके जप्त केली आहेत.

Story img Loader