मुंबई : गणेश विसर्जन आणि ईद एकाच दिवशी आल्याने पोलिसांवर पडणारा ताण लक्षात घेता ईदच्या मिरवणुका शुक्रवारी काढण्याचा तोडगा काढण्यात आला. यानुसार राज्यात ईदची सुट्टी ही गुरुवारऐवजी शुक्रवारी (२९ सप्टेंबर) देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला. परिणामी गुरुवारपासून सोमवापर्यंत सलग पाच दिवस शासकीय कर्मचाऱ्यांना सुट्टय़ांचा आनंद लुटता येणार आहे

उद्या गुरुवारी  गणेश विसर्जन म्हणजे अनंत चतुर्दशीची सुटी आहे.  त्याच दिवशी ईद ए मिलादचा सण असल्याने दोन्ही सणांची होणारी गर्दी आणि मिरवणुकांचे योग्य व्यवस्थापन करणे पोलीस प्रशासनास शक्य व्हावे, यासाठी शुक्रवार २९ सप्टेंबरला ईद ए मिलादची शासकीय सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. ऑल इंडिया खिलाफत समितीच्या शिष्टमंडळाने यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन शुक्रवारी सुट्टी जाहीर करण्याची विनंती केली होती.

woman hair salon operator file case against shop owner for threatening in dombivli
डोंबिवलीतील केश कर्तनालयाचा नियमबाह्य ताबा घेणाऱ्या गाळे मालकाविरुध्द गुन्हा
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Organ donation, brain dead patient,
सांगली : मेंदुमृत रुग्णाचे अवयवदान; लष्करी अधिकाऱ्याला सलामी
The accused in the case of kidnapping and murder of a 12 year old boy from Wadala was arrested Mumbai news
वडाळ्यातील १२ वर्षांच्या मुलाच्या अपहरण व हत्याप्रकरणातील आरोपीला अटक
Dapoli, Pin Stuck in Woman's lungs, Walawalkar Hospital, successful surgery, pin stuck in lung, SIM card pin, bronchoscopy, Ratnagiri,
दापोली : मोबाईल सिम कार्ड काढण्याची पिन महिलेच्या फुफ्फुसात अडकली, वालावलकर रुग्णालयाच्या वैद्यकीय चमूला पिन काढण्यात यश
Gold Silver Price
Gold-Silver Price: सोन्याचे भाव कोसळल्यानंतर पुन्हा वधारले; मुंबई-पुण्यातील १० ग्रॅमची किंमत आता…
A prisoner serving a life sentence escapes from an open jail in Yerawada Pune news
येरवड्यातील खुल्या कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा भोगणारा कैदी पसार
pune youth buried after electrocuted
पुणे: जखमी तरूणाला उपचाराऐवजी खड्डयात गाडून पुरण्याचा प्रकार, सिंहगड रस्ता पोलिसांकडून दोघेजण ताब्यात

या शिष्टमंडळात खासदार राहुल शेवाळे, आमदार अबू आझमी, आमदार रईस शेख, माजी मंत्री नसीम खान आदींचा समावेश होता.  अनंत चतुर्दशी आणि ईदच्या मिरवणुका एकाच दिवशी निघाल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती होती. शुक्रवारी ईदची सुट्टी जाहीर झाल्याने शासकीय कर्मचाऱ्यांना सलग पाच दिवस सुट्टी मिळणार आहे. गुरुवारी अनंत चतुर्दशी, शुक्रवारी ईद, शनिवार व रविवारची साप्ताहिक तर सोमवारी गांधी जयंतीची सुट्टी असेल. राज्य शासनाने ईदची सुट्टी बदलल्याने बँका आता शुक्रवारी बंद राहतील.

मुख्यमंत्र्यांचे आवाहन

अनंत चतुर्दशीनिमित्त गणरायाला आपण मनोभावे निरोप देऊ,  विसर्जन मिरवणुकीतही नेहमीप्रमाणे शिस्त पाळावी आणि शांतता, सद्भावनेच्या वातावरणात गणेश विसर्जन पार पाडावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी  राज्यातील गणेशभक्तांना केले आहे.