मुंबई : केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पाच पोलीस अधिकाऱ्यांची भारतीय पोलीस सेवेत (आयपीएस) निवड केली आहे. ते महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) २००३ तुकडीचे अधिकारी आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार, राज्यातील श्रीकांत धिवरे (पोलीस अधिक्षक, सीआयडी पुणे), प्रकाश जाधव (पोलीस उपायुक्त, मुंबई शहर), डाॅ. विनयकुमार राठोड (पोलीस उपायुक्त, परीमंडळ पाच, ठाणे शहर), अश्विनी सानप (पोलीस अधिक्षक, सिक्युरिटी कॉर्पोरेशन) आणि डाॅ. रश्मी करंदीकर (पोलीस अधिक्षक, नागरी संरक्षण) यांना भापोसे दर्जा मिळाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

केंद्रीय सेवा दलातील आयपीएस पदासाठी प्रत्येक राज्यासाठी नेमून दिलेल्या पदांपैकी २५ टक्के कोटा हा राज्यातील अधिकाऱ्यांसाठी (मपोसे) राखून ठेवलेला असतो. एमपीएससीतून उपअधिक्षक पदी नियुक्ती झालेल्या अधिकाऱ्यांना सुमारे दोन दशकांच्या सेवेनंतर त्यांच्या सेवा ज्येष्ठतेनुसार आयपीएसचा दर्जा मिळतो. त्यासाठी सेवा पुस्तिकेत एकही प्रतिकूल नोंद असून चालत नाही. निवड झालेल्या या अधिकाऱ्यांना राष्ट्रीय पोलीस अकादमीमध्ये काही महिन्यांसाठी आयपीएस प्रशिक्षण घ्यावे लागणार आहे. त्यानंतर ते पुढील सेवेत रुजू होणार आहेत.