खारीगाव टोल नाक्याजवळ आज पहाटे कार आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. पहाटे साडेचारच्या सुमारास हा अपघात घडला. या विचित्र अपघातानंतर आत्तापर्यंत कारमधून दोन शव बाहेर काढण्यात यश आलं आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
आणखी तीन शव बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे बचाव नियंत्रक पथकातर्फे सांगण्यात आले आहे. हा अपघात कुणाच्या चुकीमुळे झाला हे अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिस अपघाताच्या कारणाचा शोध घेत आहेत.