दुबईहून मुंबईत तस्करीसाठी आणलेले तब्बल दिड कोटी रुपयांचे पाच किलो सोने मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरच पकडण्यात आले असून फराह अली या व्यक्तीस अटक करण्यात आली आहे. फराह अली याने हे सोने आपल्या अंगावरील कोटामध्ये दडवून आणले होते. शनिवारी पहाटे अडीच वाजता दुबईहून आलेल्या विमानातील प्रवासी फराह अली (४२) हा आपल्या सामानाची नोंद न करताच  बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत होता. त्याच्या अंगावरील कोट जड असल्याचे सीमाशुल्क अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्याला थांबवून त्याची तपासणी केली असता त्याच्या कोटाला आतील बाजूस नऊ खिसे असल्याचे लक्षात आले. त्यात प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये सोन्याची बिस्किटे असल्याचे अधिकाऱ्यांना आढळून आले. हे सोने तस्करीसाठी आणण्यात आले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Story img Loader