नवी मुंबई पालिकेतील राष्ट्रवादीचे घणसोली येथील नगरसेवक संजय पाटील यांच्यावरील हल्ला त्यांच्या गावातील अजय पाटील या तरुणाच्या इशाऱ्यावरुन झाल्याचे स्पष्ट झाले असून या प्रकरणीअजय पाटील, हर्षल गुंजाल, नितीन कोंढाळकर, सुजीत कांबळे, दिलीप सातपुते या  पाच मारेकऱ्यांना अटक करण्यात आली आहे. पाटील यांच्यावरील हल्ला हा बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्याच्या पुरवठा वादातून झाल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान पाटील यांची या हत्या करण्याचे ठरले होते पण मारेकऱ्यांच्या बंदुकीतील गोळी लॉक झाल्याने सुटली नाही.
नवी मुंबईतील बांधकामांना लागणाऱ्या साहित्यावरुन नेहमीच वाद  होत असतात. बिल्डर ते स्थानिक नेते, पोलीस, भाई यांच्याद्वारे सोडविण्याचा प्रयत्न करतात. यात स्थानिक नगरसेवकाची भूमिका महत्वाची मानली जाते. याच वादातून संजय पाटील आणि अजय पाटील यांचा वाद सुरू होता. अजयला एक साईट न दिल्याने त्याचा राग होता. त्यामधूनच त्याने आपल्या साथीदारांना संजय यांना मारण्याची सुपारी दिली.

Story img Loader