fire stations Mumbai : मुंबई शहरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन मुंबईत आणखी पाच ठिकाणी नवीन अग्निशमन केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत. कांदिवली, कांजूरमार्ग, सांताक्रूझ, चेबूर व अंधेरी येथे ही नवीन केंद्रे बांधण्यात येणार असून त्यांचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी नुकतीच याबाबतची घोषणा केली. स्वातंत्र्यदिनानिमित्त केलेल्या भाषणात त्यांनी याचा उल्लेख केला.

अग्निशमन दलाच्या दर्जोन्नतीसाठी महापालिका विशेष प्रयत्न करीत असून नागरिकांमध्ये अग्निसुरक्षेविषयी जनजागृती करण्यासाठी अग्निशमन दलातर्फे विविध मॉल्स, अधिक रहदारीची ठिकाणे, चाळी आणि झोपडपट्टी, उत्तुंग इमारती व रुग्णालयांमध्ये वेळोवेळी मॉकड्रील आयोजित करण्यात येत आहे. उत्तुंग इमारतींमध्ये अग्निशमन व विमोचन कार्याकरिता ३० मी. उंचीचे शिडीचे वाहन व पाच मिनी वॉटर टेंडर अग्निशमन दलाच्या ताफ्यात दाखल करण्यात आले आहे. तर ४० मी. उंचीचे टर्न टेबल लॅडर वाहन लवकरच दाखल होणार असल्याची घोषणाही आयुक्तांनी केली.

IIT Mumbai to redesign Thane transport plan thane news
मुंबई आयआयटी करणार ठाण्याच्या वाहतुक आराखड्याची फेरआखणी; पुढील पाच वर्षांतील वाहतूक आव्हानांचा होणार अभ्यास
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
third party organizations will do scrap disposal appointment of three organizations after tender process
त्रयस्थ संस्थांकडे भंगार विल्हेवाट, निविदा प्रक्रियेअंती तीन संस्थांची नियुक्ती
12 colleges in state offering acupuncture treatment for first time
राज्यात प्रथमच ॲक्युपंक्चर उपचार पद्धतीची १२ महाविद्यालये
fire broke out at scrap warehouse at Kudalwadi in Chikhli on Monday morning
पिंपरी : चिखलीतील गोदामांच्या आग प्रकरणी जागा मालकाचा शोध
Panvel Municipal Commissioner decision to build infectious disease hospital in Kalamboli
कळंबोलीत साथरोग रुग्णालय; पनवेल महापालिका आयुक्तांचा निर्णय, २७ कोटींचा खर्च अपेक्षित
Pimpri , Chikhli, scrap dealers in Chikhli,
पिंपरी : चिखलीतील अनधिकृत भंगार व्यावसायिकांवर कठोर कारवाई करा; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
fire godown Pimpri-Chinchwad, Massive fire at godown,
पिंपरी-चिंचवडमध्ये गोडाऊनला भीषण आग; धुरांचे लोट काही किलोमीटर..

हेही वाचा – मध्य, पश्चिम रेल्वेवर रविवारी ब्लॉक

हेही वाचा – मुंबई : शॅम्पूच्या बाटलीत सापडले २० कोटींचे कोकेन, परदेशी महिलेला अटक

अग्निशमन दलाची क्षमता व सुविधांच्या बळकटीकरण कार्यक्रमांतर्गत ठाकूर व्हिलेज – कांदिवली (पूर्व), एल.बी.एस. मार्ग – कांजूरमार्ग (प.) या दोन्हीही ठिकाणी नवीन अग्निशमन केंद्रे बांधण्याचे काम लवकरच पूर्ण होणार आहे. जुहू तारा रोड – सांताक्रुझ (प.), माहूल रोड-चेंबूर व टिळक नगर येथे नवीन अग्निशमन केंद्रे बांधण्याचे काम लवकरच हाती घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. अग्निशमन दलाच्या दर्जोन्नतीसाठी चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात विविध प्रकल्पांसाठी २३२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

Story img Loader