मुंबई : जोगेश्वरी येथील मजासवाडी परिसरातील चुन्नीलाल मारवाडी चाळीत रविवारी सायंकाळी ५च्या सुमारास एका घराचा काही भाग अचानक कोसळला. या दुर्घटनेत तीन महिलांसह दोन पुरुष जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल केल्यानंतर चौघांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. जखमी तरुणीवर अद्यापही रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा – राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये स्तनपान कक्ष बांधणार, सामाजिक उत्तरदायित्व निधीतून ७० कक्ष साकारणार

हेही वाचा – मुंबईतील रस्ते आणखी चकचकीत, मार्चपर्यंत १५ यांत्रिकी झाडू, कचरा उचलणारी यंत्रे घनकचरा विभागाच्या ताफ्यात

दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मदतकार्य हाती घेतले. या दुर्घटनेत ललिना भाटी (२६), विक्रम भाटी (२८), नितीन म्हामुनकर (४२), फॅन्सी भाटी (३५) यांच्यासह ११ वर्षीय लतिका असे एकूण पाच जण जखमी झाले होते. उपचारासाठी जखमींना तात्काळ नजीकच्या ट्रॉमा रुग्णालयात दाखल करण्यात आले. विक्रम, नितीन, फॅन्सी व लतिका यांना फारसे लागले नसल्याने उपचार करून घरी सोडण्यात आले. सद्य:स्थितीत ललिना भाटी या तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Story img Loader