सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मौजे गुंज (बुधावली) या शासकीय आश्रमशाळेची भिंत सोमवारी सकाळी कोसळून पाच विद्यार्थी जखमी झाले आहेत. यापैकी तीन विद्यार्थी गंभीर जखमी असून त्यांना ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उर्वरित दोघांना वाडा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शासकीय आश्रमशाळांची दुरावस्था झाली असून तेथे विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन शिक्षण घ्यावे लागत आहे. गुंज आश्रमशाळेच्या दुरावस्थेबाबत वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली नसल्यामुळेच हा अपघात झाला, असा आरोप पालककडून केला जात आहे.

Story img Loader