मुंबई : गॅरेजमधील मोटारगाडीत खेळण्यासाठी गेलेल्या एका पाच वर्षांच्या मुलाचा श्वास कोंडल्याने त्याचा यामध्ये मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी मुलुंड परिसरात घडली आहे. याबाबत नवघर पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करत तपास सुरू केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईत कारवाई ; सव्वा दोन कोटींची रोख जप्त

कबीर कनोजिया (५) असे या मयत मुलाचे नाव असून तो मुलुंडच्या आंबेडकर नगर परिसरात राहात होता. त्याच्या वडिलांची मुलुंडच्या म्हाडा वसाहत परिसरात पान टपरी असल्याने नेहमी तो त्यांच्याकडे येत असे. गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास देखील तो त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या टपरीवर गेला. त्यानंतर तो बाजूला असलेल्या गॅरेजमधील काही मोटारगाड्यांमध्ये खेळत होता. बराच वेळ तो दिसला नाही म्हणून त्याच्या वडिलांनी तत्काळ त्याचा शोध सुरू केला, मात्र तो सापडला नाही. अखेर सायंकाळी पाचच्या सुमारास येथील एका मोटारगाडीत हा मुलगा बेशुद्ध अवस्थेत एका इसमाला दिसून आला. त्याने त्याच्या वडिलांना याची माहिती दिल्यानंतर या मुलाला बाहेर काढून तत्काळ मुलुंडच्या अगरवाल रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.