लोकसत्ता खास प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मुंबई: पत्नीसोबत असलेल्या अनैतिक संबंधावरून ४२ वर्षीय व्यक्तीची हत्या करण्यात आल्याचा प्रकार डोंगरी परिसरात घडला. आरोपीला २०१८ मध्ये त्याची पत्नी व मृत व्यक्तीचे अनैतिक संबंध असल्याचे समजले होते. त्यामुळे संतापलेल्या आरोपीने पत्नीची हत्या केली होती. त्याप्रकरणी अटक झाल्यानंतर तुरुंगातून बाहेर आल्यावर आरोपीने आता पत्नीच्या प्रियकराचीही हत्या केली.
ब्रीजेश प्रसाद (३९) असे अटक आरोपीचे नाव आहे. तो मूळचा बिहारमधील खानेटू येथील रहिवासी आहे. मृत धर्मा नाडर (४२) हा ब्रीजेश प्रसाद यांच्या हाताखाली सफाई कामगार म्हणून काम करीत होता. धर्मा व ब्रीजेशची पत्नी यांच्यात अनैतिक संबंध असल्याचे २०१८ मध्ये आरोपीला कळाले. त्यावेळी आरोपीने पत्नीची हत्या केली. त्याप्रकरणी लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली.
हेही वाचा… सत्तासंघर्षांचा आज निकाल : शिंदे सरकारच्या भवितव्यासह घटनात्मक गुंतागुंतीचा उलगडा होण्याची शक्यता
त्यावेळी ब्रीजेशने धर्माचाही खून करण्याची धमकी दिली होती. या प्रकरणातून तुरुंगातून बाहेर आल्यानंतर बुधवारी ब्रीजेशने डोंगरी इमामवाडा येथे चाकूने भोसकून धर्माची हत्या केली. या प्रकरणानंतर जे.जे. मार्ग पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.