Mumbai Rain : मुंबईसह राज्यभरात मुसळधार पावसाच्या सरी ( Mumbai Rain ) सुरु आहेत. या मुसळधार पावसाने देशातल्या वेगवान शहराचा म्हणजेच मुंबईचा वेग मंदावला आहे. पावसामुळे लोकल सेवा उशिराने सुरु आहे. तर दुसरीकडे विमानसेवेवरही या पावसाचा परिणाम झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

एअर इंडियाने काय आवाहन केलं आहे?

मुंबईत जो पाऊस ( Mumbai Rain ) सुरु झाला आहे त्यामुळे मुंबई विमानतळावरुन जाणारी आणि मुंबई विमानतळावर येणाऱ्या विमानांची वाहतूक मंदावली आहे. विमानं उशिराने येऊ आणि जाऊ शकतात. ज्यांना विमान प्रवास सुरु करायचा आहे त्यांनी लवकर विमानतळ गाठावं. पण संथ रदारी आणि पाणी साचल्याने विलंब होण्याची शक्यता आहे. फ्लाईट स्टेटस चेक करण्यासाठी या वेबसाईटवर माहिती घ्या असंही आवाहन एअर इंडियाने केलं आहे. वेबसाईट : https://www.airindia.com/in/en/manage/flight-status.html ही वेबसाईट सुरु केल्यानंतर प्रवाशांना त्यांचा विमानाचा नंबर पोस्ट करायचा आहे आणि तारीख टाकायची आहे. ज्यावरुन त्यांना विमानाची वेळ आणि सद्यस्थिती (Status) कळू शकणार आहे.

एअर इंडियाने पोस्ट केली विमानांबाबतची स्थिती

एअर इंडियाने एक फोटो पोस्ट करत विमानांची स्थिती समाजवली आहे. सकाळी ११ वाजता नाशिकला एक विमान आहे असं दिसतं आहे. तर मुंबईच्या जवळ काही विमानं येताना आणि जाताना दिसत आहेत. इंडिगो, एअर इंडिया ही विमानं एअर ट्रॅफिकमध्ये आहेत असं दिसतं आहे. दादरा नगर हवेली, दिव आणि दमण या ठिकाणीही विमानं आहेत असं दिसतं आहे. या ठिकाणी स्पाईसजेट, एअर इंडिया यांची विमानं आहेत असं दिसतं आहे.

हे पण वाचा- Mumbai Heavy Rain : पुढील तीन – चार तासांत मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता

मुंबईत गुरुवारी पहाटेपासून मुसळधार पाऊस

मुंबई तसेच उपनगरांत गुरुवारी पहाटेपासून मुसळधार पाऊस ( Mumbai Rain ) कोसळत असून सखल भाग जलमय झाल्याने वाहतूक अन्य मार्गे वळविण्यात आली आहे. दरम्यान, पुढील तीन ते चार तासांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.मुंबईसह ठाणे, रायगड आणि पालघर भागातही पावसाचा जोर कायम असेल. गेल्या २४ तासांत हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात ६२.५ मिमी, तर सांताक्रूझ केंद्रात ६८.१ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

मुंबईसह महाराष्ट्रात जोरदार पावसाची हजेरी

पहाटेपासून कोसळत असलेल्या पावसामुळे विक्रोळी रेल्वे स्थानकातील रुळावर पाणी साचले आहे. आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, चक्रिय वातस्थिती, विरुद्ध दिशेने येणारे वारे, तसेच मोसमी वारे उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्रावर सक्रिय आहेत. याचा परिणाम म्हणून मुंबईत पाऊस कोसळत आहे.

बुधवारी सकाळी ८:३० ते गुरुवारी सकाळी ८:३० पर्यंत मुंबईत झालेला पाऊस

मुलुंड – २२४.२ मिमी

दिंडोशी- १८४.२ मिमी

वर्सोवा – १४८ मिमी