केंद्र सरकराने ‘डिजिटल इंडिया’ अभियानचा श्रीगणेशा केल्यानंतर आता फ्लिपकार्ट या ऑनलाईन रिटेल कंपनीकडून या संकल्पनेला पुरक असे पाऊल उचलण्यात आले आहे.
भारतातील अग्रगण्य ऑनलाईन रिटेल कंपनी असणाऱ्या फ्लिपकार्टचे सर्व खरेदी व्यवहार यापुढे केवळ मोबाईल अॅप्लिकेशनच्या माध्यमातून हाताळण्यात येणार आहेत. यापूर्वी फ्लिपकार्टच्या संकेतस्थळावर जाऊन ग्राहकांना एखादी वस्तू विकत घेता येत असे. मात्र, आता हे संकेतस्थळ येत्या सप्टेंबर महिन्यापासून कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. त्यानंतर डिसेंबर महिन्यापासून ग्राहकांना केवळ मोबाईल अॅप्लिकेशद्वारेच फ्लिपकार्टवरून खरेदी करता येईल. गेल्यावर्षी फ्लिपकार्टने ‘मिंत्रा’ या इ-कॉमर्स कंपनीचे अधिग्रहण केले होते. या कंपनीचे सर्व व्यवहार मोबाईल अॅप्लिकेशद्वारेच हाताळले जात होते. भारतात दिवसेंदिवस मोबाईलधारकांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीतर्फे सांगण्यात आले आहे.

Story img Loader