गंगा नदीच्या प्रतिकृती साकारणार

मुंबई : महानगरपालिकेच्या उद्यान खात्यातर्फे भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी या तीन दिवसांच्या कालावधीत हा पुष्पोत्सव भरविण्यात येणार आहे. सलग तीन वर्ष जागतिक वृक्षनगरीचा पुरस्कार पटकाविणाऱ्या पुष्पोत्सवात यंदा राष्ट्रीय प्रतिके पानाफुलांनी साकारण्यात येणार आहे.

महानगरपालिका आयुक्त व प्रशासक भूषण गगराणी आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अमित सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उप आयुक्त चंदा जाधव, उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांच्या देखरेखीखाली पुष्पोत्सव होणार आहे. मुंबई पुष्पोत्सव म्हणजेच वार्षिक उद्यानविद्या प्रदर्शनाचे यंदाचे हे २८ वे वर्षे आहे. राष्ट्रीय प्रतिके अशी यंदाच्या महोत्सवाची संकल्पना आहे.

Rajul Patel join eknath Shinde Shiv Sena
Rajul Patel : ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला मोठा धक्का; ‘या’ महिला नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
cm devendra fadnavis orders  eradicate malaria from gadchirli
गडचिरलीतून मलेरिया हद्दपारीसाठी विशेष कृती दल! मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश…
25th edition of kala ghoda arts festival begins
काळा घोडा महोत्सवात सृजनशीलतेची उधळण; महोत्सवाचे २५ विशीत पदार्पण
Manoj Jarange Patil maulana sajjad nomani
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे आता दिल्ली हादरवणार? मुस्लीम, बौद्ध धर्मगुरुंची साथ? रणनिती तयार, हिंदीचा अडथळाही दूर
reconstruction of Bridge located between Mahim and Bandra stations successfully completed
माहीम-वांद्रे स्थानकांदरम्यान पुलाच्या पुनर्बांधणीचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
What Nana Patole Said About Devendra Fadnavis ?
Nana Patole : “देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री कसे होतील? ते निवडून येणारच नाहीत..”; नाना पटोले काय म्हणाले?

विविध प्रजातींची फुलझाडे, फळांची रोपटी, रंगबेरंगी फुलझाडे, औषधी वनस्पती आदी मिळून सुमारे ५ हजार रोपांचा या पुष्पोत्सवात समावेश असेल. यासह भारताचे राष्ट्रीय चिन्ह अशोक स्तंभ, भारताचा राष्ट्रीय ध्वज तिरंगा, भारताचा सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न, भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ, राष्ट्रीय फूल कमळ, राष्ट्रीय फळ आंबा, राष्ट्रीय पक्षी मोर, राष्टीय खेळ हॉकी, राष्ट्रीय जलचर डॉल्फिन, राष्ट्रीय वृक्ष वटवृक्ष, राष्ट्रीय चलन रुपया, राष्ट्रीय नदी गंगा आदींची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे.

आतापर्यंत कार्टून, आमची मुंबई, संगीत, सेल्फी पॉईंट, डिज्नी लँड, जलजीवन, अॅक्वाटीक वर्ड, अॅनिमल किंग्डम आदी संकल्पनांवर आधारित फुलांची सजावट करण्यात आली आहे. त्याच धर्तीवर यंदा भारताची राष्ट्रीय प्रतिके अशी संकल्पना निश्चित करून पुष्पोत्सवात फुलांची सजावट केली जात आहे. या महोत्सवात फुलझाडे आणि फळझाडांच्या प्रदर्शनासह उद्यानविषयक वस्तुंची विक्री, झाडांसाठी लागणारे खत आदींच्या विक्रीचे दालनही असेल.

Story img Loader