मॅगीवर घालण्यात आलेल्या बंदीचा निर्णय योग्य असल्याची भूमिका अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाने (एफएसएसएआय) प्रतिज्ञापत्राद्वारे उच्च न्यायालयात स्पष्ट केली आहे. स्वत:च्याच नियमांचे पालन करण्यात कंपनी अपयशी ठरल्याने ही वेळ कंपनीवर आल्याचा दावाही ‘एफएसएसएआय’ने केला आहे. दरम्यान, या प्रकरणी मंगळवारी सुनावणी होणार आहे.
मॅगीवर घातलेल्या बंदीच्या निर्णयाला आव्हान देत त्यास स्थगिती देण्याची ‘नेस्ले इंडिया’ची मागणी न्यायालयाने मागील सुनावणीच्या वेळेस फेटाळून लावली होती. मात्र याचिकेद्वारे कंपनीने उपस्थित केलेल्या मुद्दय़ांवर राज्य सरकारसह अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाला (एफएसएसएआय) दोन आठवडय़ांत उत्तर दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. शिवाय काही कारवाई करायची झाल्यास कंपनीला ७२ तास आधी त्याची सूचना द्यावी, असेही न्यायालयाने स्पष्ट केले होते.
त्यानुसार ‘एफएसएसएआय’ने प्रतिज्ञापत्र सादर करत बंदीच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. कंपनी केवळ ३० वर्षे या उत्पादनाची निर्मिती आणि विक्री करीत आहे म्हणून तिच्या सगळ्या कारखान्यांमध्ये निर्मितीबाबतच्या सगळ्या नियमांचे काटेकोर पालन केले जाते असे म्हणणे चुकीचे ठरेल. तसेच जरी कंपनीचा दावा खरा असल्याचे मान्य केले. तर मॅगीमध्ये एवढय़ा प्रमाणात शिसे आढळणे हे हेतुत: असल्याचे म्हणावे लागेल. अन्यथा चाचणीमधून ही बाब कशी काय सुटू शकते, असा प्रश्नही ‘एफएसएसएआय’ने मॅगीच्या दाव्याबाबत उपस्थित केला आहे. नोटीस दिल्याशिवाय बंदीचे आदेश दिल्याच्या कंपनीच्या दाव्याचेही ‘एफएसएसएआय’ने खंडन केले आहे. आवश्यक त्या चाचण्या केल्यानंतर तसेच जनहित लक्षात घेऊन आवश्यक त्या प्रक्रियेनंतरच बंदीचा निर्णय घेण्यात आल्याचेही ‘एफएसएसएआय’ने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
मॅगी नूडल्सची नऊ उत्पादने खाण्यास अयोग्य व आरोग्यास हानीकारक असल्याचे जाहीर करत राज्य सरकारने त्यावर बंदी घातली आहे. मात्र हा निर्णय एकतर्फी आणि बेकायदा असल्याचा दावा करत ‘नेस्ले’ने त्याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. हा निर्णय रद्द करण्याची मागणी कंपनीकडून करण्यात आली होती. तसेच निर्णयामुळे कंपनीला मोठय़ा प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागत असल्याचा दावा करत बंदीला स्थगिती देण्याची अंतरिम मागणी केली होती.

‘मॅगी’नंतर ‘टॉप रामेन’ ही बाजाराबाहेर
नवी दिल्ली : नेस्ले कंपनीची ‘मॅगी’ वादग्रस्त ठरल्यानंतर, केंद्रीय अन्नसुरक्षा नियामक संस्थेच्या आदेशानुसार इंडो निस्सिन या कंपनीनेही त्यांचा इन्स्टंट नूडल्सचा ‘टॉप रामेन’ हा ब्रँड भारतातून परत घेण्याची घोषणा केली.या महिन्याच्या सुरुवातीला नेस्लेला त्यांचे ‘मॅगी नूडल्स’ बाजारातून परत घ्यावे लागले होते, तर हिंदुस्तान युनिलिव्हरनेही त्यांचे ‘नॉर’ इन्सटंट नूडल्स परत घेतले होते.देशात लोकप्रिय असलेल्या ‘मॅगी’मध्ये शिसाचे, तसेच मोनोसोडियम ग्लुटामेटचे प्रमाण जास्त आढळल्यानंतर केंद्रीय अन्नसुरक्षा नियामक संस्थेने (एफएसएसएआय) गेल्या ८ जून रोजी भारतातील सर्व इन्स्टंट नूडल्सच्या उत्पादन सुरक्षा चाचणीविषयी सूचना जारी केल्या होत्या.आम्ही ‘टॉप रामेन’ नूडल्सची दोन मान्यताप्राप्त स्वतंत्र प्रयोगशाळांमध्ये चाचणी करवून घेतली असता, या नूडल्सच्या फक्त दोन नमुन्यांमध्ये शिसाचे प्रमाण थोडेसे जास्त आढळले, असे इंडो निस्सिन फूड्स प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक गौतम शर्मा यांनी एका निवेदनात सांगितले.

Nagpur bench of Bombay High Court grants bail to one accused in four-year-old boy kidnapping case
न्यायालय म्हणाले,‘आरोपीच्या हक्कांचे रक्षण करणे हे आमचे कर्तव्य’…
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
Vishal Gawli in custody at Naupada police station thane news
विशाल गवळी नौपाडा पोलीस ठाण्यातील कोठडीत, रेल्वे मार्गे गाठले होते बुलढाणा
prevent tax evasion without any hesitation dcm ajit pawar s instructions to senior officials
हयगय न करता करचोरी, गळती रोखा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश
bail POCSO, High court grants bail,
पोक्सोअंतर्गत अटकेत असलेल्या आरोपीला उच्च न्यायालयाकडून जामीन
Image of Allu Arjun House
Allu Arjun : अल्लू अर्जुनच्या घरावर हल्ला करणाऱ्या सहा आरोपींना जामीन, हल्लेखोरांशी मुख्यमंत्र्यांचा संबंध असल्याचा आरोप
loksatta readers feedback
लोकमानस: राज्यात आरोग्यव्यवस्थेकडे दुर्लक्षच होणार?
Story img Loader