वाढत्या महागाईची झळ थेट मंत्रालय, विधानभवनापर्यंत पोहोचली आहे. राज्य शासनाच्या विविध उपाहारगृहांतील खाद्य पदार्थाच्या दरात मोठी वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शुक्रवार १ मार्चपासून हे नवीन दरवाढ लागू होत आहेत.राज्य शासनामार्फत मंत्रालय, विधानभवन, कोकणभवन आणि चौरस आहारगृह आदी ठिकाणी उपहारगृहे चालविण्यात येतात. या सर्व उपहारगृहांमध्ये अत्यल्प किंमतीत खाद्यपदार्थ आणि जेवणही पुरविले जाते.
मात्र आता या पदार्थाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय सामान्य प्रशासन विभागाने घेतला आहे. नव्या दरांनुसार आता चहा -३ रु., कॉफी ४ रु., बटाटावडा ५ रु., भजी ७ रु., अंडाकरी ७ रु., मिसळ पाव १० रु. तर भोजनथाळी १५ रु. अशा किंमती असतील. मांसाहारी जेवणासाठी सध्याच्या दरापेक्षा दहा रुपये जादा मोजावे लागणार आहेत.

Story img Loader