सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यक्रमात भोजन घेतल्याने कल्याण पूर्व भागातील तेरा जणांना विषबाधा झाली. त्यांची प्रकृती चांगली असल्याचे पालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितले.
शिव सह्य़ाद्रीनगरमधील बाल गणेश गणेशोत्सव मंडळाने सार्वजनिक भोजनाचा कार्यक्रम सोमवारी आयोजित केला होता. या कार्यक्रमात रहिवाशांनी भोजन घेतल्यानंतर त्यांना उलटय़ा, जुलाब सुरू झाले. यामध्ये सहा पुरुष, सहा महिला व एका मुलीचा समावेश आहे. त्यांना पालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
 तरुणीची आत्महत्या
डोंबिवलीतील चोळेगाव भागातील योगिता तिरमिरे (वय १७) हिने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पालक घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीला आला. तिच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

Story img Loader