मुंबई : दुबईहून न्हावा शेवा बंदरात आणलेल्या कंटेनरमधून १० कोटी रुपयांच्या परदेशी सिगारेटचा साठा जप्त करण्यात महसूल गुप्तवार्ता संचलनालयाला (डीआरआय) यश आले आहे. कार्पेटच्या नावाखाली सिगारेटची तस्करी करण्यात येत होती. याप्रकरणी डीआरआय अधिक तपास करत आहे.

न्हावा शेवा बंदरात विदेशी सिगारेटचा साठा येणार असल्याची माहिती डीआरआयच्या मुंबई पथकाला मिळाली. त्यानुसार, पथकाने शोध मोहीम राबवली. यादरम्यान चायनीज व्हिस्कोस कार्पेट म्हणून घोषित केलेल्या मालामध्ये असलेला विदेशी सिगारेटचा साठा जप्त करण्यास यश आले. त्यात जवळपास ६७ लाख २० हजार सिगारेट जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांची किंमत १० कोटी आठ लाख रुपये आहे.

Vande Bharat passenger finds insects in food, Railways slaps Rs 50000 fine on caterer
वंदे भारत प्रवाशाला अन्नात सापडले किडे, रेल्वेने केटररला ठोठावला ५० हजार रुपयांचा दंड
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
silver truck mankhurd
मुंबई: मानखुर्द येथे चांदीचा ट्रक अडवला, ८० कोटींची आठ हजार ४७६ किलो वजनाची चांदी जप्त
Mumbai airport international travelers
Mumbai Airport International Passengers: मुंबई विमानतळावरून १२ लाख प्रवाशांची आंतरराष्ट्रीय वारी
Jewellery worth six and half lakhs was stolen from passenger at Swargate ST station
स्वारगेट एसटी स्थानकात चोरट्यांचा उच्छाद, प्रवासी तरुणाकडील साडेसहा लाखांचे दागिने चोरीला
pune private hospital pollution
पुणे: खासगी रुग्णालयांवर कारवाईचा बडगा ! नियमांचे पालन न केल्याप्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पाऊल
pune puram chowk loksatta
पुणे : पूरम चौकात १६ लाखांचा गुटखा पकडला, टेम्पोचालकाला अटक

हेही वाचा – विशेष मुलांसाठी नायर रुग्णालयात उपलब्ध होणार टेलिमेडिसिन सुविधा; ग्रामीण, दुर्गम भागातील रुग्णांना होणार लाभ

हेही वाचा – लालबाग येथील शाळेच्या पुनर्बांधणीला मुहूर्त मिळेना

दुबईच्या जेबेल अली बंदरावरून सिगारेटचा साठा न्हावा शेवा बंदरात पाठवण्यात आला होता. त्यात कोरियामध्ये तयार केलेल्या सिगारेटचा समावेश आहे. केंद्रीय यंत्रणांपासून लपविण्यासाठी तस्करांनी कागदोपत्री कार्पेट असल्याचे घोषित केले होते. याबाबत डीआरआय अधिक तपास करत आहे.