मुंबई : महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) अमली पदार्थांची तस्करी करीत असल्याच्या संशयावरून परदेशी नागरिकाला ताब्यात घेतले होते. या परदेशी नागरिकाच्या पोटातून कोकेनने भरलेल्या ११० कॅप्सूल बाहेर काढण्यात आल्या. या कोकेनची किंमत सुमारे ९.७५ कोटी रुपये आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून यासंदर्भात डीआरआय अधिक तपास करत आहे.

परदेशी नागरिक मूळचा ब्राझिलमधील रहिवासी आहे. तस्करी करीत असल्याच्या संशयावरून त्याला मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ताब्यात घेण्यात आले होते. त्याच्या पोटात अमली पदार्थ असल्याचा अधिकाऱ्यांना संशय होता. त्यामुळे त्याची वैद्याकीय चाचणी करण्यासाठी न्यायालयाकडे परवानगी मागण्यात आली होती. जे. जे. रुग्णालयात त्याचा एक्सरे व सोनोग्राफी करण्यात आली. त्यावेळी त्याच्या पोटात संशयित कॅप्सूल असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर डॉक्टरांनी त्याच्या पोटातून या ११० कॅप्सूल काढल्या. त्यात कोकेन असल्याचे निष्पन्न झाले.

582 citizens benefited from the medical services of Vighnaharta Nyas
‘विघ्नहर्ता न्यास’च्या वैद्यकीस सेवेचा ५८२ नागरिकांना लाभ
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
gauraksha worker beaten up kalyan marathi news
कल्याणमध्ये अ. भा. गौ रक्षा महासंघाच्या कार्यकर्त्याचे अपहरण करून तबेल्यात बेदम मारहाण, जिवंत गाडून टाकण्याची आरोपींची धमकी
Controversy over the initials Rama written on the body of a goat
बकऱ्याच्या अंगावर लिहिलेल्या राम आद्याक्षरावरून वाद; न्यायालयात नेमके काय घडले?
construction houses mangroves, state government,
खारफुटीवर घरे बांधल्याच्या तक्रारीच्या तपासणीचे राज्य सरकारला आदेश
Crime News
Crime News : गोमांस खाल्ल्याच्या संशयावरुन मजुराची मारहाण करुन हत्या, गोरक्षा समितीच्या पाच सदस्यांना अटक
Union Minister Of port and shipping approved wage hike of port and dock workers
बंदर, गोदी कामगारांना साडेआठ टक्के वेतनवाढ, केंद्रीय बंदर व जहाजमंत्र्यांची मंजुरी
Two sent to Yerawada jail in Kalyaninagar accident case Pune news
कल्याणीनगर अपघात प्रकरणात दोघांची येरवडा कारागृहात रवानगी

हेही वाचा…मुंबईसह ठाणे, पालघर आणि कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता

जप्त करण्यात आलेल्या कोकेनचे वजन ९७५ असून त्याची किंमत सुमारे ९.७५ कोटी रुपये आहे. भारतात तस्करी करण्यासाठी अमली पदार्थ असलेल्या कॅप्सूलचे सेवन केल्याचे आरोपीने चौकशीत कबुल केले. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून यासंदर्भात डीआरआय अधिक तपास करत आहे.