सीमा शुल्क विभागाच्या हवाई गुप्तचर कक्षाने(एआययू) केलेल्या कारवाईत चार कोटींच्या परदेशी चलनासह एका कुटुंबातील तीन सदस्यांना अटक केली. आरोपी दुबईला जाण्याच्या प्रयत्नात होते, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.मुंबई विमानतळावर एआययूने केलेल्या कारवाईत चार लाख ९७ हजार अमेरिकन डॉलर जप्त केले आहेत. त्याची किंमत चार कोटी १० लाख रुपये असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. एआययूने मिळालेल्या माहितीच्या आधारे एका कुटुंबातील तिघांना विमानतळावर ताब्यात घेण्यात आले. ते सर्व दुबईला जाण्याच्या तयारीत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा