केंद्रीय निवडणूक आयोगाच्या ‘आली लहर केला कहर’ कारभाराचा फटका आता राजकारण्यांप्रमाणे अधिकाऱ्यांनाही बसू लागला आहे. आयोगाने आपल्या निरीक्षकांवर ठेवलेल्या अशाच अंधळ्या विश्वासामुळे राज्यातीलच नव्हे तर चक्क  परदेशात प्रशिक्षणासाठी गेलेल्या एका सनदी अधिकाऱ्यावर आचारसंहिताभंगाचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आयोगाच्या अतिरेकी कारभाराबद्दल राजकारण्यांबरोबर आता सनदी अधिकारीही उघडपणे नाराजी व्यक्त करू लागले आहेत.
नाशिक महापालिकेचे आयुक्त संजय खंदारे यांच्यावर आचारसंहितेचा ठपका ठेवून रविवारी त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. मात्र ज्यांच्यावर आचारसंहिता भंगाचा ठपका ठेवण्यात आला आहे, ते खंदारे गेल्या दोन महिन्यांपासून परदेशात प्रशिक्षणासाठी असल्याचे स्पष्ट झाले आहे. अन्य महापालिकांप्रमाणे कल्याण-डोंबिवली (२४ फेब्रुवारी) आणि नाशिक महापालिकेने (४ मार्च) रोजी म्हणजेच आचारसंहिता लागू होण्यापूर्वी त्यांच्या क्षेत्रात मान्सूनपूर्व कामे करण्यासाठी अनुक्रमे ४ मार्च आणि २४ फेब्रुवारी रोजी निविदा काढल्या होत्या. खड्डे भरण्यासाठी या निविदा काढल्या व त्या स्थायी समितीत मंजूर करण्यात आल्या. मात्र आयोगाच्या नाशिक आणि कल्याण येथील निवडणूक निरीक्षकांनी महापालिका आयुक्तांची ही कृती आचारंसहिता भंग करणारी असल्याचा ठपका ठेवत दोन्ही आयुक्तांवर कारवाई करण्याचा अहवाल आयोगास पाठविला होता. त्यानुसार खंदारे यांच्याबाबत राज्याचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडून अभिप्राय मागविण्यात आला. त्या वेळी नाशिक पालिका आयुक्तांकडून आचारसंहितेचा भंग झाला नसून सर्व प्रक्रि.या आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसारच करण्यात आल्याचा निर्वाळा देण्यात आला़  त्यानंतर कल्याण -डोंबिवली पालिका आयुक्त शंकर भिसे यांच्याबद्दल तर अधिकाऱ्यांकडून अभिप्रायच न मागविता थेट दोन्ही अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा