मुंबई : मुंबईमधील भाभा अणुशक्ती संशोधन केंद्र परिसरात बुधवारी एका सोनेरी कोल्ह्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले असून या कोल्ह्याने परिसरातील एका महिलेवर हल्ला केला होता. दरम्यान, चेंबूर परिसरात सोनेरी कोल्ह्याने सोमवारी तरुणावरही हल्ला केला होता.

भाभा अणुशक्ती संशोधन केंद्र परिसरात बुधवारी एका महिलेवर सोनेरी कोल्ह्याने हल्ला केल्याची घटना घडली. समोरून आलेल्या कोल्ह्याने अचानक महिलेवर हल्ला केला. महिलेला तातडीने रेबीज प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. दरम्यान, जेरबंद केलेल्या सोनेरी कोल्ह्याला रेबीजची लागण झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. चेंबूर परिसरात सोमवारी एका तरुणावर सोनेरी कोल्ह्याने हल्ला केला होता. तसेच नोव्हेंबरमध्ये एका सोनेरी कोल्ह्याचा रेबीजमुळे मृत्यू झाला होता. त्या कोल्ह्याने परिसरातील एका लहान मुलावर हल्ला केला होता. त्याच्यावर वेळीच वैद्यकीय उपचार केल्याने धोका टळला.

Woman Raped By Mantrik in Mumbai
Mumbai Crime : महिलेवर बलात्कार करुन दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्या मांत्रिकाला अटक, मुंबई पोलिसांची कारवाई
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Kondhwa police station, women police beaten ,
कोंढवा पोलीस ठाण्यात गोंधळ घालून महिला पोलिसांना धक्काबुक्की
Mumbai Police launched drive against illegal nylon manja registering 19 cases
नागपूर : जीवावर बेतले, नाकावर निभावले; नॉयलान मांजाने महिला पोलीस कर्मचाऱ्याचे…
What is Schizophrenia Disorder| Schizophrenia symptoms Treatment in Marathi
Schizophrenia: स्किझोफ्रेनियाग्रस्त आईने केली मुलाची हत्या; काय आहे हा विकार?
misunderstanding of kidnapping because of girl scream in car
कारमध्ये आरडाओरड करणे आले अंगलट, काय घडले?
2 year old girl die while playing due to car accident
नागपूर : दोन वर्षीय चिमुकलीने आईच्या कुशीत सोडला जीव…
Permanent ban on feeding chicken meat to tigers in Nagpur
नागपुरात वाघांच्या ‘मटण पार्टी’वर कायमची बंदी…‘एच-५एन-१’ विषाणूमुळे…

हेही वाचा…Gateway Of India Boat Accident : स्पीडबोटची टक्कर आणि एलिफंटाला जाणारी ‘नीलकमल’ बोट बुडाली, नेमका कसा झाला अपघात?

दरम्यान, चेंबूर परिसरात आतापर्यंत रेबीजची लागण होऊन तीन कोल्ह्यांचा मृत्यू झाला आहे. यामुळे वनविभागाने चेंबूर परिसरात जनजागृती मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. वनविभागाने भाभा अणुशक्ती संशोधन केंद्र (बीएआरसी) आणि आसपासच्या परिसरात मॅपिंग सुरू केले असून, सोनेरी कोल्ह्याच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरा ट्रॅपिंग करण्यास सुरुवात केली आहे. तसेच ठाण्याचे उपवनसंरक्षक अक्षय गजभिये यांच्या अध्यक्षतेखाली वन्यप्राण्यांच्या मृत्यूच्या चौकशीसाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये सहाय्यक वनसंरक्षक दत्तात्रेय मिसाळ, सोनल वळवी, ज्ञानेश्वर रक्षे, तसेच रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टच्या नेहा पंचमिया, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विनया जंगले यांचा समावेश आहे. यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात एका सोनेरी कोल्ह्याचा रेबीजमुळे मृत्यू झाला होता. मुंबईमध्ये रेबीजची लागण होऊन वन्यप्राण्याचा मृत्यू झाल्याची ही पहिली नोंद होती. त्यानंतर नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्येही रेबीजची लागण होऊन दोन सोनेरी कोल्ह्यांचा मृत्यू झाला होता.

Story img Loader