मुंबई: गोरेगावमध्ये मध्यरात्री बाराच्या सुमारास जंगलात भीषण आग लागली. तब्ब्ल एक किमी परिसरात ही आग पसरली होती. मध्यरात्री अडीच वाजता आग विझवण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गोरेगाव पूर्वेकडील ए के वैद्य मार्गावर इन्फिनिटी आयटी पार्कच्या समोर असलेल्या जंगलात शनिवारी मध्यरात्री भीषण आग लागली. आगीची वर्दी मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे पथक आणि वन खात्याचे पथकही रवाना झाले होते. डोंगराळ भागातील झाडे, झुडपे, पाला पाचोळा या आगीत जळून खाक झाला. मध्यरात्री अडीचच्या सुमारास ही आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Forest fire in goregaon at midnight mumbai print news amy