वनमंत्री गणेश नाईक यांची घोषणा

मुंबई : राज्यातील राखीव वनक्षेत्रांत वनसफारीचा आनंद घेणाऱ्या पर्यटकांनी वन्य प्राण्यांची वाट रोखून धरू नये. वन्य प्राण्यांची वाट रोखणाऱ्या पर्यटकांवर कारवाई करण्याचे संकेत वनमंत्री गणेश नाईक यांनी दिले. वन्य प्राणी अधिवास सोडून मानवी वस्तीत जाऊ लागले आहेत. त्यासाठी ब्रिटिश कालखंडात करण्यात आलेल्या उपाययोजना केल्या जातील असेही त्यांनी सांगितले.

राज्यात वाघ व बिबट्यांचे हल्ले वाढले आहेत. त्यासाठी वन विभागाकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली. वाघ, बिबट्या भोजनासाठी मानवी वस्तीत प्रवेश करू लागल्याने त्यांच्या भोजनाची व्यवस्था त्यांच्या अधिवास क्षेत्रात करणे गरजेचे आहे. जंगलाच्या कोर क्षेत्रात फळ-झाडांची लागवड करण्याचा प्रस्ताव तयार केला जात असून, फळ-झाडांमुळे प्राण्यांचा अधिवास वाढेल, असा आशावाद नाईक यांनी व्यक्त केला.

What Ajit Pawar Said?
Ajit Pawar : धनंजय मुंडे नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देणार का? विचारताच अजित पवारांचं उत्तर, “मी इतकं स्पष्ट सांगतो….”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
pm narendra modi launches mission mausam
‘मिशन मौसम’ला सुरुवात; हवामान विभाग भारतीयांच्या वैज्ञानिक प्रगतीचे प्रतिक, पंतप्रधानांचे गौरवोद्गार
centre appointed alok aradhe as chief justice of bombay high court
मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी आलोक आराधे; देवेंद्र कुमार यांची दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून बदली
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
Loksatta editorial Donald Trump won US presidential election
अग्रलेख: तो परत आलाय…
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Manoj Jarange Patil maulana sajjad nomani
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे आता दिल्ली हादरवणार? मुस्लीम, बौद्ध धर्मगुरुंची साथ? रणनिती तयार, हिंदीचा अडथळाही दूर

हेही वाचा >>> ‘मिशन मौसम’ला सुरुवात; हवामान विभाग भारतीयांच्या वैज्ञानिक प्रगतीचे प्रतिक, पंतप्रधानांचे गौरवोद्गार

जंगलामध्ये लागणारे वणवे विझविण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर सध्या आग लागण्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. ही आग विझविण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा अभ्यास केला जाईल. त्यासाठी वेळप्रसंगी छोटी विमाने वापरली जातील, वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात झालेल्या मनुष्यहानीत नुकसान भरपाई देण्यासंर्दभात शासन पातळीवर विचार विनिमय सुरू आहे. वन्यप्राण्यांच्या क्षेत्रात जनतेने प्रवेश करू नये असे आवाहन नाईक यांनी केले.

वाघ शिकारीची चौकशी

नागपूर येथील गोरेवाडा प्राणीसंग्रहालयातील वाघ बिबट्यांचा मूत्यू कोंबडीचे मांस खाल्यामुळे झाला असल्याचा प्राथमिक अहवाल आहे. याचा वैद्यकिय चाचणी अहवाल अहवाल आल्यानंतर कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे वनमंत्र्यांनी सांगितले. पांढरकवडा वन विभागाच्या वणी परीक्षेत्रातील वाघाची शिकार झाली असून, वन अधिकारी या शिकारीची चौकशी करीत आहेत.

Story img Loader