ठाणे महापालिका आयुक्त निवासस्थानामध्ये नियम धाब्यावर बसवून बेकायदा बांधकाम केल्याप्रकरणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईकांनी केलेल्या तक्रारीची दखल राज्याचे वनमंत्री पतंगराव कदम यांनी घेतली असून या प्रकरणाचा तपास करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी ठाणे वनसंरक्षक विभागाला दिले आहेत. त्यानुसार, ठाणे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी महापालिका आयुक्त निवासस्थानाची पाहणी केली असून यासंदर्भातील अहवाल शुक्रवारी वरिष्ठांना सादर करण्यात येणार आहे.
कोलशेत येथील सव्‍‌र्हे न. १४६  या भुखंडावर ठाणे महापालिका आयुक्तांच्या निवासस्थानी आर. ए. राजीव यांनी या निवासस्थानामध्ये नियम धाब्यावर बसवून बांधकाम केल्याचा आरोप सरनाईकांनी केला होता.  वनखात्याची खासगी वने या भुखंडावर कोणतेही बांधकाम, अंतर्गत बदल, डागडुजी अथवा सुशोभीकरण करणे कायद्याने गुन्हा आहे, याचाच आधार घेत सरनाईक यांनी आयुक्त निवासस्थानातील बांधकामप्रकरणी वनमंत्री कदम यांच्याकडे तक्रार केली होती.         

Story img Loader