कल्याण डोंबिवली पालिका परिवहन समितीचे सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक साद खोत यांना एका महिलेच्या विनयभंगप्रकरणी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. खोत यांनी जामिनासाठी कल्याण न्यायालयासमोर अर्ज केला होता. अर्ज फेटाळताना न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी
सुनावली.
पोलिसांनी सांगितले, गेल्या दोन महिन्यांपूर्वी एका महिलेने साद खोत यांच्यावर विनयभंग केल्याची तक्रार बाजारपेठ पोलीस ठाण्यात केली
होती.
 त्यानंतर खोत यांनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. या अर्जावर सोमवारी सुनावणी घेण्यात आली. हा अर्ज फेटाळताना न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, साद खोत यांनी या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण यापूर्वीच दिले आहे. आपल्याला या प्रकरणात गुंतविण्यात आल्याचे खोत यांनी म्हटले आहे.

Story img Loader