मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांनंतर बेपत्ता असलेल्या परमबीर सिंह यांना कोर्टाने फरार घोषित केलं आहे. परमबीर सिंह यांच्याकडून अनेक दावे केले जात असले तरी त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांची मालिका सुरु आहे. त्यातच आता पोलीस खात्यातील एका अधिकाऱ्याने त्यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. मुंबईमधील निवृत्त एसीपी शमशेर पठाण यांनी परमबीर सिंह यांनी दहशतवाद्यांना मदत केली होती असा गंभीर आरोप केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनिल देशमुख प्रकरणी परमबीर सिंह यांचा चौकशी आयोगासमोर मोठा खुलासा; म्हणाले “माझ्याकडे फक्त ऐकीव….”

शमशेर पठाण यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना पत्र लिहिलं असून सखोल चौकशी करावी अशी मागणी केली आहे. विशेष म्हणजे या तक्रार अर्जात त्यांनी परमबीर सिंह यांनी २६/११ दहशतवादी हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबचा मोबाईल लपवला होती अशी शंकाही व्यक्त केली आहे. परमबीर सिंह यांनी दहशतवादी अजमल कसाबचा मोबाईल लपवून ठेवला होता किंवा कुणाला तरी दिला होता असं त्यांनी म्हटलं आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे परमबीर यांना अटकेपासून संरक्षण

परमबीर सिंह यांनी महाराष्ट्र एटीएसमध्ये कार्यरत असताना अजमल कसाबचा मोबाईल चौकशीसाठी घेतला होता. या प्रकरणाची चौकशी मुंबई क्राइम ब्रांचकडे देण्यात आली होती. त्यानंतर परमबीर सिंह यांनी तो मोबाईल क्राइम ब्रांचकडे दिला नव्हता, असा दावा पठाण यांनी तक्रारीत केला आहे.

मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला तेव्हा याच मोबाइलवरुन कसाबसह इतर दहशतवादी पाकिस्तानमधील हँडलरशी संवाद साधत होता. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी पठाण यांनी केली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former acp shamsher pathan letter to mumbai police commissioner parambir singh ajmal kasab sgy