मुंबई : मुंबई महापालिकेत सध्या पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांचा पक्षपाती आणि एकतर्फी कारभार सुरू असल्याचा आरोप करून मुंबई काँग्रेसने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. निधी वाटपाबाबत केलेल्या पक्षपातीपणाबाबात व अन्य तक्रारींबाबत सर्व माजी नगरसेवकांनी मंगळवारी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची भेट घेतली व पालिकेतील कारभाराबाबत तक्रारी मांडल्या.
मुंबई महापालिकेमध्ये गेल्या दीड वर्षांपासून प्रशासकांची राजवट सुरू आहे. या कालावधीत पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांचा मनमानी कारभार सुरू असून भाजपच्या मंत्र्यांपुढे आयुक्तांनी गुडघे टेकले असल्याची तक्रार काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली. काँग्रेसच्या सर्व माजी नगरसेवकांनी मंगळवारी आझाद मैदान येथील मुंबई काँग्रेसच्या कार्यालयात वडेट्टीवार यांच्याशी पालिकेतील कारभाराबाबत चर्चा केली. यावेळी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्यासह पालिकेतील माजी विरोधीपक्षनेते रवी राजा, माजी नगरसेवक आसिफ झकेरीया आदी उपस्थित होते.
प्रशासकांच्या काळात अत्यंत अपारदर्शक पद्धतीने प्रस्ताव मंजूर केले जात आहेत. अनेक कामांमध्ये खर्च वाढीचे प्रस्ताव मोठ्या प्रमाणावर येत असतात. अनेक कामे ही काळ्या यादीतील कंत्राटदारांना दिली जातात अशा तक्रारी नगरसेवकांनी केल्या. तसेच पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पालिका मुख्यालयात कार्यालय सुरु केल्यामुळे भाजपच्या माजी नगरसेवकांना हक्काचे कार्यालय मिळाले आहे. तसेच पालिकेचा विकासनिधी भाजपच्या आमदारांच्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर वळवला जात असल्याची तक्रारही माजी नगरसेवकांनी केली.
पालिका आयुक्तांनी भाजपला झुकते माप दिल्याची तक्रार करण्यात आल्याचे रवी राजी यांनी सांगितले. पालिकेचे नियम डावलून कारभार केला जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. ही पहिली बैठक असून या गैरव्यवहाराला विरोध कसा करायचा याबाबत पुढील दिशा ठरवली जाईल असेही ते म्हणाले.