Uddhav Thackeray Sena Ex Leader Abhishek Ghosalkar Shot Dead : आज शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर मॉरिस नावाच्या इसमाने गोळीबार केला. अभिषेक घोसाळकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यांचा मृत्यू झाला आहे. मॉरिसने त्यांच्यावर ४ ते ५ गोळ्या झाडल्या. २ फेब्रुवारीला गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याची घटना ताजी असतानाच आता ही घटना घडली आहे. (Latest News) आपण जाणून घेऊ

अभिजित घोसाळकर कोण होते?

अभिषेक घोसाळकर हे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र होते.

boy injured in accidental firing by retired army jawan revolver
निवृत्त जवानाच्या रिव्हॉल्वरमधून झालेल्या गोळीबारात मुलगा जखमी; धनकवडीतील घटना; जवानाविरुद्ध गुन्हा
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
Ratan Tata Goa Dog dead
Ratan Tata Pet Dog: रतन टाटांच्या निधनानंतर पाळीव श्वान ‘गोवा’ याचाही मृत्यू? व्हायरल मेसेजनंतर मुंबई पोलीस काय म्हणाले?
Ajit Pawar On Baba Siddique :
Baba Siddique : “बाबा सिद्दीकी यांच्यावरील गोळीबाराची घटना वेदनादायी…”, उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया
Shivsena Pune, Shivsena presence in Pune,
आव्वाज कुणाचा?
gang stabbed young man with koyta in dandiya event
दांडीया कार्यक्रमात टोळक्याची दहशत, तरुणावर कोयत्याने वार; सराइतासह साथीदारांविरुद्ध गुन्हा
Lalu Prasad Yadav and Tejswi Yadav
लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या मुलांना दिलासा; ‘Land For Jobs’ घोटाळा प्रकरणी जामीन मंजूर!
Imtiaz Jaleel, case against Imtiaz Jaleel, Pune,
माजी खासदार इम्तियाज जलील यांच्याविरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल

अभिषेक घोसाळकर हे दोनवेळा मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते.

अभिषेक घोसाळकर दहिसरच्या वॉर्ड क्रमांक सातचे माजी नगरसेवक होते.

सध्या हा वॉर्ड शीतल म्हात्रेंकडे आहे. अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी वॉर्ड क्रमांक एकच्या नगरसेविका होत्या.

अभिषेक घोसाळकर यांच्याकडे दहिसरमधलं तरुण आणि तडफदार नेतृत्व म्हणून पाहिलं गेलं होतं. त्यांच्या मृत्यूची बातमी ANI या वृत्तसंस्थेने दिली आहे.

हे पण वाचा- अभिषेक घोसाळकरांवर गोळीबार करणाऱ्या मॉरिसची स्वतःवर गोळ्या झाडून घेत आत्महत्या

फेसबुक लाईव्ह आणि मग गोळीबार

अभिषेक घोसाळकर यांनी मॉरिस नावाच्या व्यक्तीबरोबर फेसबुक लाइव्ह केलं होतं. मॉरिसने अभिषेक घोसाळकर यांना त्यांच्याच कार्यालयात एका कार्यक्रमाकरता बोलावलं होतं. यानिमित्ताने ते फेसबुक लाइव्हवरून संवाद साधत होते. संवाद संपल्यानंतर सुरुवातीला मॉरिस उठून निघून गेला. त्यानंतर, अभिषेक घोसाळकर लाईव्हद्वारे संवाद साधत होते. ही तर फक्त सुरुवात आहे. आपल्याला अजून बरंच काम करायचं आहे, असं अभिषेक घोसाळकर फेसबुक लाईव्हमध्ये बोलत होते. त्यांचा हा संवाद संपताच अभिषेक घोसाळकरही जागेवरून उठले. ते उठताच त्यांच्यावर गोळीबार झाला. ते उठून गेल्यानंतर गोळ्यांचा आणि ओरडण्याचा आवाज व्हिडीओतून येत आहे. एवढंच नव्हे तर गोळीबार झाल्यानंतरही फेसबुक लाईव्ह पाऊणतास सुरूच होतं.