मुंबई : ठाणे पोलिसांनी दाखल केलेला खंडणी, फौजदारी कट रचणे आणि बनावट कागदपत्राद्वारे फसवणूक केल्याप्रकरणी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. व्यावसायिक संजय पुनामिया यांनी राजकीय सूडबुद्धीने आपल्याविरोधात पोलिसांत तक्रार नोंदवली होती, असा दावाही पांडे यांनी याचिकेद्वारे केला आहे.

पांडे यांनी पोलीस महासंचालकपदी असताना पदाचा दुरुपयोग केला, तसेच पैसे उकळून खोटी विधाने देण्यास भाग पाडल्याचा आरोप पुनामिया यांनी तक्रारीत केला होता. परंतु, तीन वर्षांच्या विलंबानंतर पुनामिया यांनी पांडे यांच्याविरोधात तक्रार केली. तसेच, जून २०२२ मध्ये मुंबई पोलीस आयुक्त म्हणून निवृत्त झाल्यापासूनच पांडे यांच्याविरोधात राजकीय सूडबुद्धीने कारवाई केली जात आहे, असा दावा पांडे यांच्या वतीने सोमवारी न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीच्या वेळी करण्यात आला.

Torres case, police , accused, High Court,
आरोपी न सापडण्यास पोलीसच जबाबदार, टोरेसप्रकरणी उच्च न्यायालयाचे खडेबोल
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Jaideep Apte , bail , High Court,
मालवण शिवपुतळा दुर्घटना प्रकरण, जयदीप आपटे याला उच्च न्यायालयाकडून जामीन
supplementary chargesheet in Kalyaninagar accident case and chargesheet against accused in blood sample tampering case
कल्याणीनगर अपघात प्रकरणात पुरवणी आरोपपत्र, रक्ताचे नमुने बदल प्रकरणात आरोपीविरुद्ध आरोपपत्र
Accused of murdering young woman remanded in custody Pune news
पुणे : तरुणीचा खून करणाऱ्या आरोपीला कोठडी
mastermind , construction businessman murder ,
पुणे : बांधकाम व्यावसायिकाच्या खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार अटकेत, दोन कोटींच्या खंडणीसाठी अपहरण
youth who attacked builder gets 10 year jail
बांधकाम व्यावसायिकावर कुऱ्हाडीने वार करणाऱ्या तरुणाला सक्तमजुरी; न्यायालयाकडून आरोपीला पाच लाखांचा दंड
police failed to prove, conviction , accused driving car allegation, mumbai,
बेदरकारपणे गाडी चालवल्याचा आरोप : आरोपीच गाडी चालवत असल्याचे सिद्ध करण्यात पोलिसांना अपयश, शिक्षा रद्द

हेही वाचा >>>बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणः आरोपींनी नक्षलग्रस्त भागात प्रशिक्षण घेतल्याचा संशय

पुनमियाचे हे सराईत तक्रारकर्ते असून त्यांच्याविरोधातही अनेक गुन्हे दाखल आहेत, असा दावा करून पांडे यांच्यातर्फे पुनामिया यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले. तसेच, पुनामिया यांनी यापूर्वीही अशाच प्रकारची तक्रार केली होती. ती फेटाळण्यात आल्याचेही पांडे यांच्यातर्फे न्यायालयाला सांगण्यात आले. तसेच, त्यांच्याविरोधात ठाणे पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची आणि तपासाला स्थगिती देण्याची मागणी पांडे यांच्यातर्फे करण्यात आली.

पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार, पांडे यांच्यासह दोन सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आणि इतरांवर पुनमिया यांना खोट्या प्रकरणांत गोवण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. तसेच, २०२१ मध्ये आपण सैफी रुग्णालयात दाखल असताना आपल्याला माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबईचे माजी पोलीस परमबीर सिंग यांना अडकवण्यासाठी पांडे यांनी अधिकाऱ्यांमार्फत संदेश पाठवला होता. त्यास नकार दिल्यानंतर त्यावेळी पोलीस महासंचालकपदी असलेल्या पांडे यांनी आपल्याला धमकावल्याचा दावाही पुनामिया यांनी केला होता.

Story img Loader