मुंबई : मुंबई महापालिकेतून स्वेच्छा निवृत्ती घेऊन माजी शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी शिवसेनेत (उद्धव ठाकरे) प्रवेश केला आहे. शिवसेनेने (उद्धव ठाकरे) तडवी यांना चोपडा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे.
हेही वाचा – एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी वेतन देण्यास टाळाटाळ
मुंबई महापालिकेतील शिक्षण विभागात तब्बल ३१ वर्षे कार्यरत असलेल्या राजू तडवी यांच्याकडे सध्या शिक्षणाधिकारी पदाची सूत्रे होती. काही दिवसांपूर्वीच तडवी यांनी मुंबई महापालिका शिक्षणाधिकारी पदावरून स्वेच्छा निवृत्ती घेतली आणि आपली राजकीय कारकीर्द सुरू केली. उद्धव ठाकरे यांनी नुकताच ‘मातोश्री’ निवासस्थानी राजू तडवी यांना एबी फॉर्म दिला असून चोपडा विधानसभा मतदारसंघातून त्यांना निवडणुकीच्या आखाड्यात उतरविण्यात आले आहे.