महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी)अटक केली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात त्यांची १२ तासांहून अधिक काळ चौकशी करण्यात आली होती. त्यांना मंगळवारी कोर्टात ११ वाजता  हजर करण्यात येणार आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात सोमवारी हजर झाले. त्यावेळी त्यांचे वकीलही त्यांच्याबरोबर होते. यावेळी ईडीने त्यांचा जबाब नोंदवला. या प्रकरणी ईडीने देशमुख यांना आतापर्यंत पाच समन्स बजावले होते.

Story img Loader