महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला तुरुंगात टाकण्याचा डाव होता, असा गंभीर आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. यावरून पुन्हा एकदा राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. यावरून आता राजकीय प्रतिक्रियाही उमटत आहेत. दरम्यान, देवेंद्र फडणवीसांनी केलेले आरोपावर तत्कालीन गृहमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा – “मविआ सरकारच्या काळात मला तुरुंगात टाकण्याचा डाव”, फडणवीसांच्या आरोपावर ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Torres case, police , accused, High Court,
आरोपी न सापडण्यास पोलीसच जबाबदार, टोरेसप्रकरणी उच्च न्यायालयाचे खडेबोल
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
district court granted valmik karad get 7 days police custody
‘खंडणीच्या आड आल्याने देशमुख यांची हत्या’; युक्तिवादात विशेष तपास पथकाचा संशय
mumbai High Court urged bmc and State Government to declare they are unable to solve illegal hawkers issue
…तर असमर्थ असल्याचे तरी जाहीर करा ! बेकायदा फेरीवाल्यांच्या समस्येवरून उच्च न्यायालयाचे महापालिका, सरकारला खडेबोल
Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
Sharad Pawar and Vinod Tawade over Amit Shah Critisicm
Vinod Tawade : “पवारांनी दाऊदच्या हस्तकांना हेलिकॉप्टरमधून प्रवास घडवला”; विनोद तावडेंचा गंभीर आरोप!
Image Of Walmik Karad
Walmik Karad : वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर परळीत तरुणीकडून आत्मदहनाचा प्रयत्न
Crime News
Crime News : हत्या करावी की नाही? हे टॉस करून ठरवलं; १८ वर्षीय तरूणीच्या मृतदेहावर बलात्कार करणाऱ्या नराधमाची कोर्टात धक्कादायक कबुली

फडणवीसांचे नेमके आरोप काय ?

“माझ्यासाठी मातोश्रीचे दरवाजे उद्धव ठाकरेंनी बंद केले. पाच वर्षे आम्ही सत्तेत होतो तरीही ते असं वागले. एवढंच नाही तर मी तुम्हाला हे सांगतो की मी राजकीय वैर ठेवणारा माणूस नाही. मात्र अडीच वर्षांचं महाविकास आघाडी सरकार असताना माझ्यावर केसेस टाकण्याचं, माझ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचं, काहीही करून मला तुरुंगात टाकण्याचं टार्गेटच त्यावेळी सीपी असलेल्या संजय पांडे यांना दिलं होतं”, असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी माझाच्या कार्यक्रमात केला होता.

हेही वाचा – “आमचं शाहरूख खान, सलमान खानसारखं नाही, त्यांचा…”, राज ठाकरेंची जोरदार राजकीय टोलेबाजी

तत्कालीन गृहमंत्र्यांनी आरोप फेटाळले

दरम्यान, फडणवीसांनी केलेले आरोप तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी फेटाळून लावले आहेत. देवेंद्र फडणवीस नेमकं काय बोलले हे मी ऐकलेलं नाही. मात्र, त्यांनी जो आरोप केला आहे, तसा कोणताही प्रयत्न महाविकास आघाडीच्या काळात झाला नाही. फडणवीस हे त्यांना असलेल्या माहितीच्या आधारे बोलले असतील. मात्र, मला जी माहिती आहे, त्यानुसार तेव्हाच्या राज्य सरकारने असा कोणताही प्रयत्न केला नव्हता, असं ते म्हणाले.

Story img Loader