लोकसत्ता खास प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मुंबई : मृतदेहाच्या पिशव्या खरेदीप्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) गुरूवारी सहा तासांहून अधिक काळ चौकशी केली. यापूर्वी पेडणेकर यांनी चौकशीला उपस्थित राहण्यासाठी ईडीकडे चार आठवड्यांचा अवधी मागितला होता. ईडीने त्यांना ई-मेल पाठवून २३ नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले होते.
ईडीच्या अधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना मी व्यवस्थित उत्तरे दिली. त्यांनी काही कागदपत्रे मागितली आहेत. आम्ही त्यांची लवकरच पूर्तता करू. मी ईडीने समन्स पाठवल्यानंतर पहिल्या तारखेला येऊ शकले नाही. मी महापौर होते, त्या अनुषंगाने मला प्रश्न विचारण्यात आले. मी चौकशीला सामोरे गेली. मी चौकशीला खरी उत्तरे दिली आहेत, अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी चौकशीनंतर व्यक्त केली. दरम्यान, मृतदेह खरेदी कंत्राटाबाबत त्यांनी कोणावर दबाव टाकला. याबाबत ईडी अधिकाऱ्यांनी पेडणेकर यांना प्रश्न विचारले. चौकशीत पेडणेकर यांनी त्याला नकार दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
आणखी वाचा-हार्बर, ट्रान्स हार्बर लोकल प्रवास वेगवान
मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ५ ऑगस्ट रोजी याप्रकरणी पेडणेकर यांच्यासह वेदान्त इनोटेक प्रा. लि, तत्कालिन अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त, मध्यवर्ती खरेदी विभागाचे (सीपीडी) तत्कालिन उपायुक्त व अनोळखी सरकारी कर्मचारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी ४९ लाख ६३ हजार रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. महानगरपालिकेने ८ मार्च २०२० रोजी मृतदेह ठेवण्यासाठी एक हजार पिशव्या खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. सर्व पाहणी केल्यानंतर १६ मार्च रोजी वेदान्त इनोटेक प्रा. लि. कंपनीला ६,७१९ रुपये प्रति पिशवी खरेदीचे कंत्राट देण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा ११ मे रोजी प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यावेळी वेदान्तसह आणखी एका कंपनीला अंतिम करण्यात आले होते; पण त्यावेळी तत्कालिन महापौर किशोरी पेडणेकर यांनी महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्याला भायखळा येथील बंगल्यावर बोलावून वेदान्त इनोटेकलाच कंत्राट देण्यास सांगितले, असे एका वैद्यकीय अधिकाऱ्याने जबाबात सांगितले होते. याप्रकरणी ईडीनेही नुकताच गुन्हा दाखल करून तपासाला सुरूवात केली होती.