मुंबईचे माजी नगरपाल व ज्येष्ठ समाजसेवक नाना चुडासामा यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले आहे. मुंबईतील चर्चगेट येथील राहत्या घरी त्यांचे निधन झाले. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक या क्षेत्रांत त्यांनी उल्लेखनीय कार्य केले होते.
भाजपाच्या प्रवक्त्या शायना एनसी यांचे ते वडील होत. त्यांनी मुंबईचे महापौरपद ही भूषवले होते. जायंट इंटरनॅशनल या संस्थेचे ते संस्थापक होते. मुंबई माझी लाडकी, फोरम अगेन्स्ट ड्रग्ज ॲण्ड एड्स, नॅशनल किडनी फाऊंडेशन, कॉमन मेन्स फोरम अशा निरनिराळ्या संस्थांच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्य केले आहे. २००५ साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते. आज सांयकाळी ५.३० वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.