मुंबई : करोना काळात गेल्या दोन वर्षांत तत्कालीन मुख्यमंत्री-मंत्री राज्यातील ज्या भागात गेले नाहीत, तेथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी गेले. त्यांनी तीन वर्षांच्या कार्यकाळात तब्बल १०७७ जाहीर कार्यक्रम व समारंभात हजेरी लावली आणि राज्यातील विद्यापीठांच्या ४८ दीक्षांत समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथे केले.

तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देशासाठी आशेचा किरण आहेत. देवाची इच्छा असेल तर ते देशासाठी खूप मोठे कार्य करतील, अशी अपेक्षा कोश्यारी यांनी व्यक्त केली.

तीन वर्षांच्या कार्यकाळातील दोन वर्षे करोना असूनदेखील संपूर्ण राज्यभर अविश्रांत भ्रमण करणारे, मराठी भाषा शिकून जनसामान्यांशी संवाद साधणारे व राजकारणात राहून साधेपणा जपणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे राष्ट्रसेवेला समर्पित जीवन आहे. त्यांच्यावरील पुस्तक हे मानवी मूल्ये, प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा व साधेपणाचे संकलन आहे, असे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सांगितले.   ‘भगतसिंह कोश्यारी : अ  सोल डेडिकेटेड टू द नेशन’ या डॉ तुषार कांती बॅनर्जी लिखित पुस्तकाचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राजभवन येथे प्रकाशन करण्यात आले आहे.

Story img Loader