मुंबई – आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी यांच्या नावाने कंपन्यांच्या संचालकांशी संपर्क साधून फसवणूक करणाऱ्या कर्नाटकच्या माजी रणजीपटूला मुंबई सायबर पोलिसांनी अटक केली. नागराजू अप्पलास्वामी बुडूमुरु असे या क्रिकेटपटूचे नाव असून त्याने मुंबईतील एका व्यावसायिकाला १२ लाखांना फसविले. त्याने अशाचप्रकारे सुमारे ६० कंपन्यांची ३ कोटीची फसवणूक केली असल्याचे निष्पन्न झाले आहे. उदयोन्मुख क्रिकेटपटूंसाठी प्रयोजकत्व हवे असल्याचे सांगून आरोपी कंपन्यांची फसवणूक करत होता. खेळाडूंसाठी राखीव जागेवर नोकरी देण्याचे प्रलोभन दाखवून फसवणूक झाल्यानंतर नागराजू याने इतरांची फसवणूक करण्याचा मार्ग पत्करला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> मुंबई : कौटुंबिक काणांमुळे महिलांवर सर्वाधिक अत्याचार; केईएम रुग्णालयाच्या अभ्यासातून उघड

विद्युत उपकरणांची वक्रिि करणाऱ्या दुकानाची साखळी असलेल्या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकास एक दूरध्वनी आला होता. दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी यांचा स्वीय सहायक नागेश्वर रेड्डी बोलत असल्याचे सांगितले. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांना आपल्याशी बोलायचे आहे, असेही सांगितले. त्यानंतर दुसऱ्या व्यक्तीने जगमोहन रेड्डी बोलत असल्याचे सांगून रिकी भुई या खेळाडूला क्रिकेटचे साहित्य घेण्यासाठी १२ लाख रुपयांची गरज असल्याचे सांगितले. रक्कम हस्तांतरीत करण्यासाठी बँक खाते क्रमांक दिला. विश्वास बसावा यासाठी आंध्र क्रिकेट असोसिएशनची कागदपत्रेही पाठवली. मुख्यमंत्री कार्यालयातून दूरध्वनी असल्याने कंपनीने रक्कम पाठवली. मात्र नंतर फसवणूक झाल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी याबाबत पश्चिम प्रादेशिक सायबर पोलिस ठाण्यात तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी फसवणूक व माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. याप्रकरणी तंत्रज्ञानाच्या मदतीने तपास केला असता नागराजू बुडूमुरु याचा याप्रकरणातील सहभाग उघड झाला. चौकशीदरम्यान तो कर्नाटकचा माजी रणजीपटू असल्याचे समजले. सुमारे तीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तेलंगणामध्ये त्याच्याविरुद्ध ३० गुन्ह्यांची नोंद आहे.

हेही वाचा >>> दापोली रिसॉर्ट प्रकरणः निलंबीत अधिकाऱ्याला ईडीकडून अटक

क्रिकेटमध्ये भवितव्य घडविण्यासाठी नागराजू याने एका राजकीय नेत्याची मदत घेतली होती. त्याने खेळाडूंसाठी राखीव जागेवर नोकरी देण्याचे प्रलोभन दाखवून नागराजू याच्याकडून लाखो रुपये घेतले होते. मात्र प्रत्यक्षात नोकरीला लावलेच नाही. नागराजूने अनेक नेत्यांकडे दाद मागितली मात्र कुणीच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यानेही अशाचप्रकारे फसवणूक करण्यास सुरूवात केली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former ranji player arrested in cyber fraud case mumbai print news zws