ज्येष्ठ भाजपा नेते, उद्योगपती आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल वीरेन शहा यांचे शनिवारी हृदयविकाराच्या धक्क्याने जॉर्डनमध्ये निधन झाले ते ८६ वर्षांचे होते. सुट्टी व्यतीत करण्यासाठी सपत्नीक जॉर्डनच्या दौऱ्यावर गेले असताना तेथेच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांचे पार्थिव मुंबईत आणण्यात येणार असून मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या कौटुंबिक सूत्रांनी वृत्तसंथांशी बोलताना दिली. वीरेन शहा हे भाजपचे माजी खजिनदार होते. मुंबईतील मुकंद लि. या नामांकित कंपनीचे व्यवस्थापकीय संचालकपदही त्यांनी भूषविले होते.
गुजरातमधील जुनागढ मतदारसंघातून १९६७ मध्ये ते लोकसभेत गेले होते, तर १९७५ ते ८१ या काळात ते राज्यसभेचेही सदस्य होते. १९९९ ते २००४ या कालावधीत ते पश्चिम बंगालचे राज्यपाल होते.
वीरेन शहा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी शोक व्यक्त केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा