दादरमधील अपघातात बाळापाठोपाठ महिलेचाही मृत्यू; त्याच रात्री आणखी काही दुचाकीस्वार जखमी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दादरच्या चित्रा चित्रपटगृहासमोरील रस्त्यावर खचलेल्या पेव्हरब्लॉकमध्ये दुचाकी अडकून झालेल्या दुचाकीच्या अपघातातात जखमी झालेल्या सबा शेख यांचा गुरुवारी रात्री उशिरा मृत्यू झाला. सबा यांचा चार महिन्यांचा मुलगा साद हा बुधवारी अपघातस्थळीच दगावला होता. त्याच रात्री याच ठिकाणी आणखी चार-पाच दुचाकीस्वार पडल्याचेही प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.

कुर्ला पश्चिमेकडील प्रीमियर रेसिडन्सी वसाहतीत राहणारे वसीम शेख हे पत्नी सबा, मुलगी मायशा आणि मुलगा साद यांना घेऊन बुधवारी दुचाकीवरून दक्षिण मुंबईकडे निघाले होते. ईदचा दिवस असल्याने सारे जण आनंदात होते. मात्र, दादर टीटी येथील उड्डाणपूल उतरताच त्यांची दुचाकी खड्डय़ात अडकून घसरली. वसीम आणि मायशा एका बाजूला फेकले गेले तर सबा आणि साद दुसऱ्या बाजूने येत असलेल्या टँकरखाली चिरडले गेले. यात चार महिन्यांच्या सादचा जागीच मृत्यू झाला, तर सबा यांचा गुरुवारी रात्री मृत्यू झाला.

पूल उतरल्यानंतरचा रस्ता पेव्हर ब्लॉकचा आहे. अनेक ठिकाणी पेव्हर ब्लॉक उचकटल्याने खड्डे पडले आहेत. त्यामुळे दुचाकीस्वारांसाठी हा खड्डा जीवघेणा ठरत आहे. बुधवारी वसीम यांच्या दुचाकीचा अपघात झाल्यानंतर याच ठिकाणी आणखी चार-पाच दुचाकीस्वार धडपडल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. यात काही जण जखमी झाले. त्यांच्यावर केईएममध्येच उपचार करण्यात आल्याचे वसीम यांचे बंधू मोहम्मद हुसेन यांनी सांगितले. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनीही याला दुजोरा दिला.

आग्रह केल्याचे शल्य

ईदचा दिवस असल्याने वसीम यांनीच दक्षिण मुंबईला फिरायला जाण्याचा बेत आखला. चार महिन्यांचा साद लहान असल्याने त्याला घेऊन जाण्यास सबा तयार नव्हत्या. मायशाला घेऊन तुम्ही जा, असेही त्यांनी वसीम यांना सांगितले होते. मात्र, वसीम यांनी फार आग्रह केल्याने हे चौघेही जण दुचाकीवरून निघाले. आपण आग्रह केला नसता तर, पत्नी व मुलगा जिवंत असता, याचे शल्यच वसीम यांना सतावत असून अपघातानंतर ते बोलण्याच्याही मन:स्थितीत नाहीत.

अज्ञात वाहनाची धडक?

अपघातानंतर वसीम यांचा जुजबी जबाब भोईवाडा पोलिसांनी नोंदवून घेतला आहे. येत्या काही दिवसांत पोलिसांकडून त्यांचा तपशीलवार जबाब नोंदवून घेतला जाईल. प्राथमिक माहितीत वसीम यांनी पूल उतरल्यानंतर अज्ञात वाहनाचा धक्का बसला व टँकरखाली फेकले गेलो, इतकीच त्रोटक माहिती पोलिसांना दिली आहे.

‘गर्दी फक्त बघत होती’

अपघात झाल्यानंतर घटनास्थळी गर्दी जमली. मात्र, बहुतेक जण मोबाइलवर या घटनेचे चित्रीकरण करण्यातच दंग होते. वसीम यांनीच स्वत:ला सावरत सादचे विखुरलेले अवशेष गोळा केले आणि सबा यांना उचलून केईएमकडे धाव घेतली, अशी माहिती हुसेन यांनी दिली.