माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी कोब्रा या जातीचा नाग आढळला आहे. मातोश्री बंगल्यावरच्या कर्मचाऱ्यांना हा नाग दिसला. त्यामुळे त्यांनी सर्पमित्रांना बोलावलं आणि वन्यजीव संरक्षण तसंच रेस्क्यू टीमलाही पाचारण केलं. सर्पमित्रांनी शिताफीने या नागाला पकडलं आणि जंगलात सोडलं. मातोश्री बंगल्यातल्या पाण्याच्या टाकीमागे हा नाग लपला होता.

हे पण वाचा- संजय राऊतांच्या निवासस्थानी आढळला विषारी साप!; पत्रकार परिषद संपताच सुरक्षारक्षकांची तारांबळ

रेस्क्यू टीमला ही माहिती जेव्हा मिळाली तेव्हा ते तिथे पोहचले. त्यांनी त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने या नागाला पकडले आणि जंगलात सोडले. या संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशनच्या दरम्यान तेजस ठाकरेही तिथे उपस्थित होते. त्याचप्रमाणे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही उपस्थित होते. हा नाग पकडला गेल्यानंतर उद्धव ठाकरेंनी सर्पमित्रांचे आभार मानले आहेत. मातोश्री बंगल्यात नाग शिरल्याची बातमी उद्धव ठाकरेंना कळली तेव्हा ते तातडीने बाहेर आले. त्यांनी या नागाला जे रेस्क्यू करण्याची प्रक्रिया होती ती पाहिली. जवळपास चार फुटांचा हा नाग होता.

D Gukesh Raj Thackeray
Raj Thackeray : जगज्जेता डी गुकेशसाठी राज ठाकरेंची खास पोस्ट; म्हणाले, “बुद्धिबळाचा हा खेळ…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
nana patole
पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजेच ‘ऑपरेशन लोटस’,पटोलेंचा घणाघात
What Devendra Fadnavis Said About Rahul Narwekar ?
Devendra Fadnavis : “राहुल नार्वेकर पुन्हा येईन म्हणाले नव्हते तरीही पुन्हा आले..”, देवेंद्र फडणवीस यांचं खुमासदार भाषण
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : “दाढी कुरवाळण्याच्या नादात जे काही पाप केले…” हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मनसेची उद्धव ठाकरेंवर टीका
Uddhav Thackeray On Raj Thackeray :
Uddhav Thackeray : “पक्षाला एक हेतू लागतो, पण हे त्या पक्षात…”, उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका
Ramdas Athawale On Raj Thackeray
Ramdas Athawale : “मी असताना राज ठाकरेंची महायुतीत गरज काय?”, रामदास आठवलेंचं मोठं विधान
What Uddhav Thackeray Said?
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचं वक्तव्य, “जनतेच्या मनातला मुख्यमंत्री मी होतो तरीही…”

संजय राऊत यांच्या भांडुपच्या निवासस्थानीही शिरला होता साप

काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या भांडुप येथील घरातही साप शिरल्याची बातमी समोर आली होती. खासदार संजय राऊत पत्रकार परिषद घेत होते. त्यावेळी हा साप तिथे निघाला. संजय राऊत यांच्या खुर्चीजवळच हा साप दिसला होता. पांदीवड नावाचा बिनविषारी जातीचा तो साप होता. त्यावेळीही सर्पमित्रांना बोलवून हा साप पकडण्यात आला. त्यानंतर आता उद्धव ठाकरेंच्या मातोश्री या निवासस्थानी किंग कोब्रा आल्याचं वृत्त समोर आलं आहे.

आशिष शेलार यांचीही प्रतिक्रिया

उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जी टीका केली त्या टीकेला आशिष शेलार यांनी जोरदार प्रत्युत्तर केलं. त्यानंतर त्यांना मातोश्रीवर साप आढळून आला त्याविषयी प्रतिक्रिया विचारली गेली. त्यावेळी आशिष शेलार म्हणाले, “कुठलाही मुंबईकर नागरिक तो कितीही विषारी बोलत असेल तरीही त्याच्या घरात साप सोडू नये. असे प्रकार होत असतील तर ते चुकीचे आहेत. मातोश्रीवर साप कसा आला? तो बाहेरून आला होता का? की तो नाग तिथेच राहात होता याची माहिती मुंबई महापालिकेने द्यावी.” असं आता शेलार यांनी म्हटलं आहे.

Story img Loader