मुंबई उपनगरातील अंधेरी भागात असलेल्या ‘आयबीएल हाऊस’ला काल (गुरूवार) रात्री लागलेल्या आगीत चौघांचा मृत्यू झाला असून ९ जण जखमी झाल्याची माहिती अग्निशमनदलाच्या अधिका-यांनी दिली आहे. अंधेरी येथील एमआयडिसी परिसरात असलेल्या आयबीएल हाऊस या इमारतीला काल मध्यरात्री आज लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमनदलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आणि त्यांनी आग आटोक्यात आणली. जखमी झालेल्या व्यक्तींना उपचारासाठी जवळच्याच सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथे उपचारादरम्यान चौघांचा मृत्यू झाला.
आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र ही आग शॉर्ट सर्कीटमुळे लागल्याचा अंदाज अग्निशमन दलाच्या अधिका-यांनी व्यक्त केला आहे.

Story img Loader