महिलेस जिवंत जाळल्याप्रकरणी वाडय़ातील चौघांना दोषी ठरवीत ठाण्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीस एस.के. काळे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
रंजना भोये या वाडय़ातील उसर गावातील नदीवर आपल्या मैत्रिणींसोबत वाळू काढण्यासाठी गेल्या होत्या. त्याचवेळी या नदीत वाळू काढण्यासाठी आलेल्या दुसऱ्या एका महिलेच्या साडीच्या रंगावरून शेरेबाजी केली. त्या महिलांमधील एकीने तिच्या भावास ही गोष्ट सांगितली. त्यावरून त्याने रंजनाशी भांडण केले. त्यानंतरही त्याचा राग शांत झाला नाही. दुसऱ्या दिवशी (१६ डिसेंबर २०१०) रंजनाच्या घरी जाऊन त्याने तिच्यावर रॉकेल ओतले. गंभीर भाजलेल्या अवस्थेत रंजनाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मात्र रंजनाचा मृत्यूपूर्व जबाब तसेच शेजाऱ्यांनी दिलेल्या साक्ष ग्राह्य़ ठरवीत रंजनाच्या हत्येप्रकरणी न्यायालयाने तिच्या हत्येप्रकरणी गुरूनाथ वाघे, महेंद्र जाधव, राजेश वाघे आणि सुभाष जाधव या चौघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. याप्रकरणी सरकार पक्षातर्फे संजय लोंढे तर आरोपींतर्फे रमाकांत पाटील यांनी काम पाहिले.

Story img Loader