मुंबई : शहरातील विविध वाहतूक बेटे आणि क्षेपणभूमी / भरावभूमीच्या ठिकाणी वायू गुणवत्ता सर्वेक्षण करण्यासाठी फिरत्या वाहनांवरील चार स्वयंचलित वातावरणीय वायू गुणवत्ता सर्वेक्षण केंद्र तयार करण्यात येणार आहेत. मुंबईतील वायू गुणवत्ता निर्देशांकाची वास्तव स्थितीदर्शक नोंद या फिरत्या वाहनांच्या मदतीने करण्यात येणार आहे. या वाहनांमार्फत उपलब्ध होणारी माहिती प्रयोगशाळेच्या माध्यमातून संनियंत्रित करण्यात येईल. नव्याने वापरात येणारी फिरती वाहने (मोबाईल व्हॅन) नागरिकांच्या प्रदूषण विषयक तक्रारीच्या अनुषंगाने वायू गुणवत्ता सर्वेक्षण करण्यासाठी वापरण्यात येणार आहेत. त्यामुळे मुंबईतील वायू गुणवत्तेचे अधिक अचूक मूल्यमापन होऊ शकणार आहे.

मुंबईतील हवेचे प्रदूषण गेल्या एक दोन वर्षांपासून वाढले आहे. त्यावरून पालिकेवरही टीका होत असते. त्यामुळे प्रदूषण कमी करण्यासाठी व प्रदूषणाचे अचूक मोजमाप व्हावे याकरीता पालिका प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून वाहनांवरील स्वयंचलित गुणवत्ता सर्वेक्षण केंद्रांची संख्या वाढवण्यात येणार आहे. यापूर्वी मुंबईत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि हवामान खात्याने अशी फिरती हवा गुणवत्ता केंद्रे तयार केली आहेत. त्यात आता पालिकेच्या चार फिरती हवा गुणवत्ता केंद्रांची भर पडणार आहे. या फिरत्या स्वयंचलित गुणवत्ता सर्वेक्षण केंद्रामुळे नागरिकांच्या तक्रारींचे जलदगतीने निवारण करणे सोपे होणार आहे. तसेच यंत्रणेलाही या वाहनांच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीचा उपयोग होईल. परिणामी प्रदूषण नियंत्रणासाठी ठोस पावले उचलण्याकरीता ही उपलब्ध आकडेवारी अतिशय उपयुक्त ठरेल, अशी माहिती उपायुक्त (पर्यावरण) मिनेश पिंपळे यांनी दिली.

Royal Enfield electric bike breaks cover globally royal enfield electric bike price features latest update
Royal Enfield ची पहिलीवहिली इलेक्ट्रीक बाईक लाँच; जबरदस्त लूक, फिचर्स अन् किंमत लगेच जाणून घ्या
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
drones paragliding banned in pune on occasion of pm narendra modi visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त ड्रोन, पॅराग्लायडर उड्डाणास बंदी; आदेशाचा भंग केल्यास कारवाईचा इशारा
mumbai weather updates city records moderate air quality
मुंबईतील हवेचा दर्जा मध्यम श्रेणीतच
BCCI conducts 6 hour review meeting with Indian team management
BCCI : टीम इंडियाच्या पराभवावर सहा तास चालली बीसीसीआयची बैठक, रोहित-गंभीरला विचारले ‘हे’ तीन महत्त्वाचे प्रश्न
Special campaign against Pneumonia by Zilla Parishad to prevent child death
बालमृत्यू टाळण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे न्यूमोनियाविरोधात विशेष मोहीम
Air Quality Index, air pollution, Uran city, raigad district
हवा प्रदूषणात उरण देशात तिसऱ्या क्रमांकावर, शहरातील नागरिकांना सर्दीखोकला तसेच श्वसनाचा त्रास
kharghar to turbhe link road work will start after maharashtra assembly election 2024
खारघर तूर्भे लिंकरोडचे काम निवडणूकीनंतर सूरु होणार

हेही वाचा – ज्येष्ठ नागरिकांना त्रास देणाऱ्या विकासकांवर दंडात्मक कारवाईची तरतूद करा, उच्च न्यायालयाचे राज्य शासनाला आदेश

मुंबई महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाअंतर्गत वायू वैविध्य सर्वेक्षण व संशोधन प्रयोगशाळा कार्यरत आहे. या प्रयोगशाळेमार्फत वातावरणीय वायू प्रदूषण मापन करण्यात येते. अद्ययावत सुधारित मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ कलम ६३ ब अन्वये पर्यावरण स्थितीदर्शक अहवाल तयार करून दरवर्षी ३१ जुलैपूर्वी महानगरपालिकेस सादर करण्यात येतो. अहवालात मागील ३ वर्षांचे वायू गुणवत्ता सर्वेक्षण अहवाल तसेच इतर विभागाची पर्यावरण संदर्भातील माहिती अंतर्भूत असते.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दिनांक १८ नोव्हेंबर २००९ च्या सूचनापत्रात एकूण १२ प्रदूषकांच्या वायू दर्जाची राष्ट्रीय मानके निर्धारित करण्यात आलेली आहेत. त्यामध्ये So2, NO2, PM10, PM2.5, O3, Pb, CO, NH3, C6H6, BaP, As, Ni यांचा समावेश आहे. तसेच केंद्र सरकारच्या राजपत्रात वायू मापन शास्त्रीय पद्धती देण्यात आली आहे. त्यानुसार वातावरणातील घटकांचे मापन होणे आवश्यक आहे.

हेही वाचा – रेल्वे प्रशासनामुळे देवदर्शन अवघड, महाशिवरात्रीनिमित्त आदल्या दिवशी विशेष रेल्वेगाडीची घोषणा; कोकणातील प्राचीन शिवमंदिरात जाण्यास अडचण

मुंबईतील प्रदूषणाची वास्तव स्थितीदर्शक पातळी, वायू गुणवत्ता निर्देशांक नागरिकांना / संशोधकांना / धोरणकर्त्यांना उपलब्ध करून देण्याकरीता या स्वयंचलित गुणवत्ता सर्वेक्षण केद्रांचा उपयोग होणार आहे. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच स्थानिक स्वराज्य संस्था यांनी स्वतःच्या अखत्यारितील वायू गुणवत्ता सर्वेक्षण केंद्राची कार्यकक्षा व यंत्रणा वाढविण्याचे निर्देश राष्ट्रीय हरित लवादाने यापूर्वीच दिले आहेत. त्यानुसार पालिकेने आणखी चार फिरत्या वायू गुणवत्ता सर्वेक्षण वाहनांमार्फत मुंबईतील जास्तीत जास्त वाहतूक बेटांवर वायू गुणवत्ता सर्वेक्षण करण्यासाठी ही केंद्रे तायर करण्याचे ठरवले आहे.