मुंबई: चेंबूर कॉलनी परिसरात बुधवारी सकाळी गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन चारजण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एका महिलेसह चौघांचा समावेश आहे. त्यांच्यावर गोवंडीतील शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास चेंबूर कॉलनीतील नॅशनल स्कुल परिसरातील जुन्या बॅरेकमध्ये ही घटना घडली. या ठिकाणी राहणाऱ्या अबुरे कुटुंबियांच्या घरात अचानक गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटानंतर त्यांच्या घराच्या भिंती कोसळल्या. परिणामी सात ते आठजण घरात अडकले होते. स्थानिकांनी तत्काळ ही माहिती अग्निशमन दलाला दिली. त्यानंतर तात्काळ अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी तत्काळ घरात अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढले. यापैकी चारजण गंभीर जखमी झाले होते. त्यांना गोवंडीतील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधातील विधानाबद्दल माजी महापौरांना अटक

विकास अबुरे (५०), अशोक अबुरे (२७), सविता अबुरे (४७) आणि रोहित अबुरे (२९) अशी जखमींची नावे असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Four people were injured in a gas cylinder explosion in chembur colony area on wednesday morning mumbai print news dvr