मुंबई : राज्य शासनाच्या सेवेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ४ टक्के महागाई भत्ता वाढ देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ती १ जानेवारी २०२३ पासून लागू करण्यात आली असून, पाच महिन्यांच्या थकबाकीसह जूनच्या वेतनापासून देण्यात येणार आहे.राज्य सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना सध्या ३८ टक्के महागाई भत्ता मिळतो. त्यात ४ टक्क्यांनी वाढ करून तो आता ४२ टक्के करण्यात आला.
१ जानेवारी २०२३ पासून ही वाढ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार गेल्या पाच महिन्यांची थकबाकीही रोखीने देण्यात येणार आहे. वित्त विभागाने त्यासंबंधीचा शासन आदेश शुक्रवारी प्रसृत केला. राज्यातील १७ लाख शासकीय अधिकारी, कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे.