कांदिवलीमध्ये एका महिलेने आपल्या भरधाव मोटारीने रिक्षा आणि दुचाकीस्वाराला धडक दिल्यामुळे एकाचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले. साक्षी पारिख असे या महिलेचे नाव आहे. तिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
साक्षी पारिख या आपल्या होंडा सीवीक मोटारीने कांदिवली लिंक रस्त्यावरून निघाल्या होत्या. सकाळी अकरा ते साडेअकराच्या सुमारास गाडीवरील ताबा सुटल्याने त्यांच्या मोटारीने एका रिक्षाचालकाला आणि दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. त्यामध्ये इजहार अहमद सिद्दीकी, लोकेश यादव यांच्यासह एकूण तीन जण जखमी झाले आहेत. मृतांचे नाव अद्याप स्पष्ट झालेले नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा