२५ लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी शिवसेनेच्या चार शाखाप्रमुखांना मुलुंड पोलिसांनी अटक केली असून या चौघांची न्यायालयाने बुधवारी जामिनावर सुटका केली. खंडणीप्रकरणात एकाच वेळी चार शाखाप्रमुखांना अटक होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
मुलुंड पश्चिमेला सचिन नाईक-साटम यांच्या मालकीचे मारुती सव्र्हिस सेंटर आहे. २४ नोव्हेंबरच्या रात्री ३ वाजता या सेंटरला आग लागून त्यात ३० गाडय़ा जळून खाक झाल्या. त्यामुळे ३० नोव्हेंबर रोजी नाईक-साटम यांनी जेसीबीद्वारे सव्र्हिस सेंटर साफ करण्यास सुरुवात केली. यासाठी शेजारीच असलेल्या भूखंडाचा वापर ते करीत होते. त्यावेळी तेथे राहणारा भास्कर नारंगेकर यांनी आक्षेप घेतला. काही वेळात शाखाप्रमुख दिनेश जाधव तेथे आले. त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली. प्रकरण हातघाईवर पोहोचले. ही जागा वापरायची असल्यास २५ लाखांची खंडणी मागण्यात आली. परंतु नाईक-साटम यांनी खंडणी देण्यास नकार देण्यात आल्यानंतर जाधव यांच्यासह रोहिदास देवाडे, रमेश वीरकर आणि शांताराम गोमाने या अन्य प्रभागातील शाखाप्रमुखांसह शाखा कार्याध्यक्ष किशोर पोतदार आदींसह १५ ते २० शिवसैनिकांनी सव्र्हिस सेंटरमध्ये येऊन तोडफोड केली. खंडणी न दिल्यास महापालिकेत तक्रार करू आदी धमकी देऊ लागले. या प्रकरणी मुलुंड पोलिसांनी गुन्हा दाखल करून चौघा शाखाप्रमुखांसह सहाजणांना अटक केली. या सर्वाची न्यायालयाने बुधवारी दहा हजार रुपयांच्या जामिनावर सुटका केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा