मुंबई : स्वारगेट एसटी स्थानकातील बलात्कारप्रकरणी आगार प्रमुख, वरिष्ठ आगार निरीक्षक, कनिष्ठ निरीक्षक आणि सहाय्यक वाहतूक अधीक्षक अशा चार अधिकाऱ्यांना हलगर्जी दाखविल्याबद्दल निलंबित करण्यात आले आहे. तर २२ सुरक्षा रक्षकांना तत्काळ बदलून नवे सुरक्षा रक्षक नेमण्याचे आदेश देण्यात आले होते, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंगळवारी विधानसभेत सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दत्तात्रय गाडे याने स्वारगेट स्थानकात शिवशाही एसटी बसमध्ये एका महिलेवर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर तातडीने २२ सुरक्षा रक्षक बदलण्याचे आदेश देण्यात आले होते. त्याचबरोबर कोणत्या एसटी कर्मचाऱ्यांनी हलगर्जी केली, त्यांची चौकशी करण्याचेही आदेश देण्यात आले होते. या चौकशीचा अहवाल आला असून या प्रकरणात चार एसटी अधिकाऱ्यांवर हलगर्जीचा ठपका ठेवण्यात आला आहे. या अहवालानुसार त्यांना निलंबित करण्यात आल्याचे सरनाईक यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले.