मुंबई : मालाड येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत चार वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी मालवणी पोलिसांनी बुधवारी सुरक्षा रक्षकाला अटक केली. आरोपीविरोधात बलात्कार, विनयभंग व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण(पोक्सो) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीच्या कृत्यामुळे पीडित मुलीला इजा झाली असून तिच्यावर शताब्दी रुग्णालयात उपचार करण्यात आले.

५२ वर्षीय आरोपी पीडित मुलीला रिकाम्या वर्गात घेऊन गेला. त्यानंतर तिला बोलण्यात गुंतवणूक तिचे डोळे बंद करून अश्लील चाळे केले. त्यानंतर मुलीला जखमी केली. त्याबाबत पीडित मुलीच्या आईला समजल्यानंतर तिने डॉक्टरांकडे नेले. त्यावेळी हा प्रकार समजला. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून मालवणी पोलिसांनी बलात्कार, विनयभंग व पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी मालाड येथील राहत्या घरातून आरोपीला अटक केली. आरोपीने इतर मुलींनाही असा त्रास दिला आहे का याचा मालवणी पोलीस तपास करीत आहेत.

Story img Loader