मुंबई : मुलीला अमेरिकेत नोकरी लावण्याचे आमीष दाखवून ६६ वर्षीय व्यावसायिकाची सव्वाआठ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी टिळक नगर पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपींमध्ये एका महिलेचा समावेश आहे.

हेही वाचा <<< आता आईच्या गुन्ह्यातून नवजात बालकांची सुटका; कारागृहामध्ये जन्माला आलेल्या बालकांच्या जन्म दाखल्यावर शहराच्या नावाची नोंद

government contractor killed over two crores extortion money
दोन कोटींच्या खंडणीसाठी शासकीय ठेकेदाराचा खून; ग्रामीण पोलिसांकडून एकास अटक; मध्य प्रदेशातून दोघे ताब्यात
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
disha patani father Jagdish Singh patani
अभिनेत्री दिशा पटानीच्या वडिलांची फसवणूक; बढती देण्याचं आमिष दाखवत २५ लाख लुबाडले
Malegaon ed investigation 125 crore rupees scam
मालेगावातील कोटींच्या उड्डाणांची ईडी चौकशी
Fraud with Sarafa by pretending to be policeman Steal gold chain
पोलीस असल्याच्या बतावणीने सराफाची फसवणूक; सोनसाखळी चोरून चोरटा पसार
Cheating with the lure of a young woman in Ganjajmun Nagpur news
गंजाजमुनात मौजमजा करायला आला अन् सुंदर तरुणीच्या आमिषाने फसला
300 crore extortion from female officer on fear of involvement in embezzlement Mumbai print news
३०० कोटींच्या गैरव्यवहारातील सहभागाची भीती दाखवून महिला अधिकाऱ्याकडून खंडणी उकळली; चौघांविरोधात गुन्हा
Mumbai High Court
“मुलीने हॉटेलची खोली बुक केली म्हणजे तिची शारीरिक संबंधांना संमती आहे असे नाही,” उच्च न्यायालयाचं परखड मत!

हेही वाचा <<< प्रताप सरनाईक यांना दिलासा; टॉप्स ग्रुपविरोधातील तपास बंद करण्याचा अहवाल न्यायालयाने स्वीकारला

तक्रारदार जयेश ठक्कर हे व्यावसायिक असून ते घाटकोपर येथील रहिवासी आहेत. आरोपी जय शहा व निशा दुसारा यांनी चेंबूर पश्चिम येथील एका हॉटेलमध्ये तक्रारदाची भेट घेतली होती. त्यावेळी ठक्कर यांची मुलगी श्रेया हिला अमेरिकेत नोकरी व ग्रीनकार्ड मिळवून देण्याचे आश्वासन जय आणि निशाने दिले होते. त्यामुळे आरोपींनी ठक्कर यांच्याकडून आठ कोटी ३३ लाख ८३ हजार रुपये घेतले. पण त्यानंतरी श्रेयाला अमेरिकेत नोकरी लावली नाही. तसेच तिला ग्रीनकार्ड मिळवून दिले नाही. तक्रारदार यांनी पैशांची मागणी केली असता आरोपींनी त्यांना रक्कम परत करण्याचे आश्वासन दिले. तसेच रक्कम परत केल्याचेही भासवले. त्यासाठी बँकेचे बनावट पत्र व स्टेटमेंटही सादर केली. २०१५ ते मार्च २०२२ या कालावधीत हा प्रकार सुरू होता. अखेर ठक्कर यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले आणि त्यांनी याप्रकरणी टिळक नगर पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी याप्रकरणी भादंवि कलम ४२०, ४०६, ४६५, ४६८, ४७१ व ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.